थराराक! व्यक्तीने डोंगराच्या आत असलेल्या नदीत बिनधास्तपणे उडी मारली अन्...; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा अस व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा अंगावर काटा आणणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही डान्स रिल्स, तसेच जुगाड, भांडण आणि स्टंट करणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. तसेच तुम्ही अनेक ॲडवेंचर करणाऱ्या लोकांचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असतील.
अनेकदा हे धाडसी लोक असे काही तरी करतात की, यांचे व्हिडिओ पाहून थरकाप उडतो. यांच्या इतके धाडस कुठून येते असा प्रश्न पडतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. एका व्यक्तीने अंधारात असलेल्या डोंगराखलील एका नदीत उडी मारली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती बिनधास्तपणे डोंगराखाली असलेल्या नदीत अंदारात उडी मारतो. एवढेच नाही तर उडी मारल्यावर त्याने आनंद व्यक्त केला आहे. त्याने उडी मारलेल्या ठिकाणचा संपूर्ण भाग खडकाळ आहे. ही नदी डोगंराच्या आतल्या भागात आहे. या ठिकाणी संपूर्ण काळोख आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण घाबरले आहेत. हा व्हिडिओ एक व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. या व्यक्तीचे एवढे धाडस पाहून अनेजण चकित झाले आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने 6 सेल्सियस डिग्री असलेल्या पाण्यात उडी मारल्याचे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @jeremynicollin या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. यावर आपल्या प्रतिक्रीया देताना एका युजरने म्हटले आहे की, बाप रे, इतक्या थंड पाण्यात कशी काय उडी मारली, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तुमच्यात एवढे धाडस येते तरी कुठून. आणखी एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, कुठे आहे ही जागा, मस्त आहे. तसेच या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक देखील केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील असे करण्याचे साहस करु नका असा सल्ला एका युजरने दिला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.