फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळताता की, आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात की, हसून पोट दुखून येते. कोणी कधी काय करेल याचा नेम नसतो. काहीजण भररस्त्यात डान्स करताना दिसतात तर काही जण धोकादायक स्टंट करताना दिसतात. काही जण धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा स्टंट करतात. अनेकदा यामुळे लोकांनी आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतच आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये एक तरुणी धावत्या ट्रेनच्या छतावर धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहे. काहींनी तिला मुर्ख म्हटले आहे, तर काहींनी सबवे सर्फर्सच्या गेम ची आठवण झाल्याचे म्हटले आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन भरधाव वेगाने धावत आहे. तसेच त्यावर एक तरुणी सबवे सर्फर्स गेममधील पा६ासारखे कोणतीही भिती न बाळगता ट्रेनच्या छतावर धावत आहे. अनेकजण फक्त तिच्याकडे पाहत उभे आहेत. ती ट्रेनच्या छतावर बिनधास्तपणे धावत आहे, नाचत आहे उड्या मारत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहे. तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @the.memeparty या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ याशिवाय इतर सोशळ मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील व्हायरलहोत आहे. व्हिडिओच्या कॅप्शमध्ये लिहिले आहे की, खऱ्या जीवनातील सबवे सर्फर्स गेम. तसेच अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, खतरनाकच दिदी, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ताईने ट्रेनला ट्रेडमिल बनवले आहे, लवकरच त्यांचे वजन कमी होईल. ही महिला खऱ्या आयुष्यात सबवे सर्फर्स खेळतेय असे आणखी एका युजरने म्हटले आहे. मात्र हा स्टंट किती धोकादायक आहे हे तिच्या लक्षात येत नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.