फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की आश्चर्याचा धक्का बसतो.तर अनेकदा मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी रिल्स, तर कधी जुगाड, स्टंट असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. रेल्वेसंबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी रेल्वतील भांडणाचे व्हिडिओ, कधी रेल्वेमध्ये डान्सचे व्हिडिओ, स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
याशिवाय, रेल्वे अपघातांचे देखील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा लोक धावत्या रेल्वेमध्ये चढण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमवतात. याशिवाय स्टंट करताना देखील लोक जीव धोक्यात घालतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक आजोबा रेल्वेरुळावरुन प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत असतात पण इतक्यात काही घडते की यामुळए त्यांचा जीव जाण्यास एक सेकंदही लागला नसता.
दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले
व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक आजोबा रेल्वेरुळावरुन क्रॉस करत प्लॅटफॉर्मवर जात आहेत. ते प्लॅटफॉर्मवर चढतच असतात इतक्यात तिकडून भरधाव वेगाने वंदे भारत एक्सप्रेस येत असते. मात्र, काही आजोबांच्या प्लॅटफॉर्मवर चढण्याच्या आणि एक्सप्रेसच्या त्यांना धडकणाच्या क्षणात काही सेकंदाचाच फरक असतो. सध्या हा धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन आपण लक्षात गेण महत्त्वाचे आहे की, अशा गोष्टींमुळे आपला जीव जाण्याची देखील शक्यता आहे. आजोबा जर त्या सेकंदात प्लॅटफॉर्मवर चढले नसते तर अनर्थ घडला असता. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @thirumal_king_thirumal_king या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी धडकी भरली आहे. एका युजरने म्हटले आहे की, बाबांचे दैव बलवत्तर आहे म्हणून प्राण वाचले, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, काय गरज होती त्यांनी असे चढायची. आणखी एका युजरने म्हटले आहे की, बाल बाल बचे. चौथ्या एका युजरने सल्ला दिला आहे की, अशा पद्धतीने कधी रेल्वे रुळावरुन क्रॉस करु नये. निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो हे या व्हिडिओतून आपण पाहू शकता. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.