
काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसरी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल
CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात स्पष्ट दिसते की, रस्त्यावर रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती हातात फायर गन म्हणून बंदूक घेऊन उभा असतो. या बंदूकाला फ्लेक्स करत तो हवेत गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो पण इथेच त्याचा पोपट होतो. फायरिंग करताच हवेत गोळी नाही धूर बाहेर पडतो. हा धूर व्यक्तीच्या चेहऱ्यावरही येतो. बंदूकीतून गोळीऐवजी निघालेला धूर पाहून व्यक्ती चांगलाच थक्क झालेला असतो. बंदूक फुसकी निघाल्यानंतर व्यक्ती पुन्हा तिला तपासू लागतो. अनेकजण व्यक्तीसोबत झालेला हा प्रकार पाहून आता त्याच्यावर मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तर काहींनी व्हिडिओतील दृष्ये पाहून हसू अनावर झालं आहे. व्हिडिओतील मिळालेला बोध असा की, प्रत्येकवेळी मारलेली हुशारी चांगली नसते, कधीकधी अतिआत्मविश्वास आपला असाच ऐनवेळी पचका करु शकतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना आधी ती नीट तपासून पाहावी.
काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
सोशल मिडियावर @asimmehmoodmir नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘सुरक्षित वाहन चालवा, जीव वाचवा’. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “जरा कल्पना कर, एका लढाईत हा लढायला ही बंदूक घेऊन गेला असता तर त्याची तिथेच ठार झाला असता”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ओव्हरकाॅन्फिडंस त्याला नडला”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “नशीब बलवत्तर म्हणून त्याचा चेहरा उडाला नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.