Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विहिरीच्या आत राजवाडा पाहिला आहे का? 300 वर्षांपूर्वी मराठ्यांनी बांधला होता अंडरग्राऊंड वाडा, पाहा Viral Video

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका प्राचीन विहिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या विहिरीच्या आत एक अंडरग्राऊंड राजवाडा बांधण्यात आला असून ही विहीर शाहू महाराजांनी बांधल्याचे म्हटले जाते. विहिरीचे सौंदर्य तुम्हाला मोहित करून टाकेल एकदा हा व्हिडिओ पहाच.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 31, 2024 | 02:32 PM
विहिरीच्या आत राजवाडा पाहिला आहे का? 300 वर्षांपूर्वी मराठ्यांनी बांधला होता अंडरग्राऊंड वाडा, पाहा Viral Video

विहिरीच्या आत राजवाडा पाहिला आहे का? 300 वर्षांपूर्वी मराठ्यांनी बांधला होता अंडरग्राऊंड वाडा, पाहा Viral Video

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या देशात अनेक प्राचीन वास्तू आहेत. प्राचीन आणि धार्मिक संस्कृतींनी समृद्ध देशातील अनेक गोष्ट जगप्रसिद्ध आहेत. देशात असे अनेक राजवाडे, किल्ले आहेत ज्यांचा भौगोलिक इतिहास आपल्याला थकक करून जातो. या वास्तूंना पाहिले की, 400-500 वर्षांपूर्वी अत्याधुनिक साधनांशिवाय या वास्तू नक्की कशा उभारल्या असाव्यात असा प्रश्न मनात येतो. सध्या अशाच एका प्राचीन वास्तूचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तुम्ही आजवर अनेक भव्य राजवाडे पाहिले असतील मात्र तुम्ही कधी विहिरीच्या आत बांधलेला राजवाडा पाहिला आहे का? नसेल तर आजच्या या व्हायरल व्हिडिओतून तुम्हाला या भव्य आणि खास राजवाड्याचे दर्शन करता येणार आहे. या राजवाड्याचे सौंदर्य बघता यापुढे ताजमहालदेखील फिका पडल्यासारखे वाटते. ही विहीर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे , जिच्या आत चक्क एक राजवाडा उभारण्यात आला आहे. अशी विहीर तुम्हाला देशातच काय तर पार जगात कुठे शोधूनही सापडणार नाही. या विहिरीला 12 मोटेची विहीर असेही म्हटले जाते.

हेदेखील वाचा – धक्कादायक! नाचताना साडी जनरेटरमध्ये अडकली अन् मृत्यूचा थरार कॅमेरात कैद, Video Viral

या विहिरीतील पाणी उपसण्यासाठी 12 मोटा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळेच हिला 12 मोटेची विहीर असे संबोधले जाते. ही विहीर सातारा जिल्ह्यातील लिंब या गावात आहे. आपण हिला वास्तुकलेची एक अप्रतिम किमया म्हणू शकतो. कारण या विहिरीची रचना एका राजवाड्याप्रमाणे करण्यात आली आहे. या विहिरीभोवती एक भलामोठा अंडरग्राऊंड महल आहे.

300 वर्षे जुनी विहीर

इसवी सन 1719 ते 1724 या दरम्यान शाहू महाराजांची पत्नी वीरूबाई यांनी दगडी विहीर बांधल्याचे सांगितले जाते. जवळपास 100 फूट खोल आणि 50 फूट रुंद असलेली ही विहीर गावकऱ्यांसाठी आजीवन पाण्याचा उत्तम स्रोत आहे. 300 वर्षांपूर्वी या विहिरीच्या परिसरात जवळपास 3 हजार कलमांची आंब्यांची झाडे लावण्यात आल्याचे म्हटले जाते. मात्र परकीय आक्रमणे आणि त्यानंतर ब्रिटीशांच्या कार्यकाळात ही सर्व झाडे हळूहळू नष्ट होऊ लागली. दरम्यान आता या विहीरीचा सुरेख व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील विहीरीची दृश्य पाहून लोक थक्क झाले आहेत.

हेदेखील वाचा – सलमान खानलाही पडली गुलिगत सूरज चव्हाणची भुरळ, Viral Video पाहिलात का?

या विहिरीचा व्हिडिओ @chetanmahindrakar नावाच्या इंस्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, विहिरीचा पूर्ण पत्ता सांगण्यात आला आहे. अनेकांना हा व्हिडिओ फार आवडला असून काहींनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, खूप सुंदर माहिती दिलीत तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, किती सुंदर.

Web Title: Viral video maratha built underground palace 300 years ago see video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 02:32 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
4

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.