बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन अखेर सुरु झाला आहे. यंदाचा सीजन थोडा हटके आणि वेगळा ठरताना दिसत आहे. शो’ने सर्व रेकॉर्ड मोडले असून हा शो आता प्रेक्षनकांच्या चांगल्याच पसंतीस पडत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या बिग बॉसची थीम, बिग बॉसचा होस्ट आणि सदस्य प्रत्येक गोष्टीत बदल झालेले तुम्हाला दिसून येईल. यावर्षीच्या बिग बॉसचे होस्टिंग रितेश देशमुख करत आहे.
बिग बॉसच्या घरात एकपेक्षा एक हटके कलाकार स्पर्धक म्हणून आल्याचे दिसून येत आहे. सदस्यांचा कल्ला प्रत्येक आठवड्यात चर्चेत ठरतो. यातील प्रत्येक कलाकाराची आपली अशी वेगळी स्टाइल आहे. यातीलच एक स्पर्धक म्हणजे सुरज चव्हाण, सुरजचे सोशल मीडियावर बरेच फॉलोवर्स असून बिग बॉसच्या घरातही तो लोकांची मन जिंकताना दिसत आहे. त्यातच आता सुरजच्या फेमस डायलॉग सोशल मीडियावर फार ट्रेंड करत असत आता सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानलाही त्याच्या डायलॉगची भुरळ पडल्याचे दिसून येत आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – धक्कादायक! नाचताना साडी जनरेटरमध्ये अडकली अन् मृत्यूचा थरार कॅमेरात कैद, Video Viral
सध्या सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडिओ फार व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान सुरजचा प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ आता नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की, सलमान खानाच्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील एक सिन आहे. मात्र यात एडिटिंग करून सलमान खानच्या मूळ डायलॉगऐवजी तो सुरजचा डायलॉग बोलताना दिसून येत आहे. आता हा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांना हा व्हिडिओ फार आवडला असून अनेकांनी एडिटरची प्रशंसा केली आहे.
पाहा सलमानचा मजेशीर व्हिडिओ
हेदेखील वाचा – शेवटी आईच ती! बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले अन् मदतीसाठी आई लोकांकडे विनवणी करू लागली, Video Viral
हा व्हिडिओ @marathi_epic_jokes नावाच्या इंस्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला अनेक लोकांनी लाइक्स दिले असून अनेकांना हा व्हिडिओ आता फार आवडला आहे. तसेच काहींनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये हसण्याच्या ईमोजी पाठवून आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर खरंच सलमानचा हा एडिटेड व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.