Viral Video mens fight in first class of Mumbai local video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. कधी बसमध्ये तर कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यावर महिलांची पुरुषांची भांडणे सुरु असतात. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच भांडण करत असतात. सध्या मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणार्या लोकलमधील एक भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये फर्स्ट क्लास डब्यात दोन प्रवाशांमध्ये वाद झाला असून या वादाचे रुपांतर मारामारीत झाले आहे.
व्हायरल व्हिडीत तुम्ही पाहू शकता की, हा वाद सीटवरून सुरू झाला आहे. सुरुवातीला दोन पुरुष सीटवरुन एकमोकांनी शिवीगाळ करतात. त्यानंतर भांडण अधिक वाढते आणि एक व्यक्ती दुसऱ्याला चक्क ट्रेनच्या सीटवर पाडतो आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे दुसरा व्यक्ती संतप्त होऊन आपला बचाव करत समोरच्याला मारायला लागतो. या घटनेमुळे आजूबाजूला गर्दी जमली असून काही प्रवाशांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी ज्या व्यक्तीवर हल्ला झालेला असतो तो भडकतो आणि “शिव्या काय देतोस, बस कर आता,” अस म्हणतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @indiansoninternett या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मुंबई लोकलमध्ये सीटवरून दोन माणसांमध्ये वाद” असे व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1.2 मिलियन व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “फर्स्ट क्लासवाले शिकलेले श्रीमंत लोक असे वागतात का?” तर दुसऱ्याने एकाने “हे आता सामान्य झालंय असे म्हटले आहे.
आणखी एका युजरने फर्स्ट क्लासमधील लोकांचा स्वतःचा ग्रुप असतो आणि ते इतरांना जागा देत नाहीत.” असे सांगितले आहे. तर “मराठी माणूस फक्त मराठी माणसालाच मारतो, बाकीच्यांना मारायची हिंमत होत नाही.” असेही एकाने म्हटले आहे. मुंबई लोकलमधील अशा घटना सामान्य प्रवाशांना नक्कीच त्रासदायक वाटतात. गर्दीतून प्रवास करताना संयम, सहकार्य आणि एकमेकांप्रती आदर ठेवणं ही प्रवाशांची जबाबदारी आहे. असे वाद टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वसंयम पाळण्याची गरज आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.