Viral Video of bike stunt young boys on express highway video goes viral
सध्या सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी स्टंटबाजीचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. जीवाची कसलीही पर्वा न करता तरुण प्रसिद्धीसाठी अत्यंत धोकादायक स्टंट करत आहे. स्टंटबाजीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे किंवा गंभीर दुखापत झाली आहे. तरीही परस्थितीचे गांभीर्य विसरुन स्टंटबाजी सरुच आहे. विशेषत: यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सध्या असाच एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चार तरुण भर रस्त्यावर मोठ्या वाहनांची रहदारी सुरु असताना बाईक स्टंट करत आहे. परंतु तरुणांना भर रस्त्यात स्टंटबाजी करणे चांगलेच महागात पडले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक्सप्रेस वे वर वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु आहे. याच वेळी काही तरुण बाईक वाऱ्याच्या वेगाने चालवत आहेत. बाईक चालवताना तरुणांची स्टंटबाजी देखील सुरु आहे. तरुण बाईक वाकडी-तिकडी चालवत आहेत. याच वेळी एका बाईक चालवणाऱ्याचा अचानक तोल जातो. यामुळे बाईक चालवणार आणि त्याच्या मागे बसलेले जोरदार खाली कोसळतात. दरम्यान मागून एक ट्रक येत असतो. परंतु काही क्षणातच दोन्ही तरुणन बाजूला होतात. सुदैवाने दोघांना कोणतीही गंभीर दुखापत होत नाही. परंतु क्षणाचाही विलंब झाला असता तर दोघेही ट्रकखाली आले असते. दोन्हीही तरुणांनी हेल्मेट घातलेले नव्हते यामुळे त्यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली असती. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Satisfied but not completely 😂 pic.twitter.com/2C1L6OBJGP
— 𝗟 𝗼 𝗹 𝗹 𝘂 𝗯 𝗲 𝗲 (@Lollubee) April 29, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Lollubee या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, नशीब बलवत्तर होतं. तर दुसऱ्या एकाने छपरी बाईकर्स असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना डोकं फुटल्याशिवाय अक्कल येत नाही.
यापूर्वी देखील अशा अनेक स्टंटबाजीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अनेकजण आपला आणि आपल्यासोबत इतरांचाही जीव धोक्यात घालतात. स्टंटबाजीमुळे जीवाला कसा धोका निर्माण होऊ शकतो याचे जिवंत उदाहरण हा व्हिडिओ आहे. मात्र तरीही लोक आपला जीव धोक्यात घालायला मागे पुढे पाहत नाहीत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.