तुफान राडा! कॉलेज कॅम्पसमध्येच भिडल्या तरुणी; एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या अन्..., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. याशिवाय भांडणाचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधीही कुठेही कोणीही भांडण करत असते. सध्या असाच एक तरुणींच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कॉलेज कॅम्पसमध्ये काही तरुणींमध्ये भांडणे झाली आहेत. या तरुणींमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली आणि हा वाद इतका वाढला की हाणामारी पर्यंत पोहोचला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन तरुणींमध्ये कोणत्या तरी कारणांवरुन शाब्दिक वाद सुरु आहे. अचानक असे काहीतरी घडते की या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. ऑरेंज ड्रेसमध्ये असलेली मुलगी समोर काळ्या ड्रेसमध्ये असलेल्या मुलीचे केस ओढायला लागते आणि तिच्या कानाखाली मारायला लागते.
काळ्या ड्रेसमधील मुलगी देखील शांत बसत नाही. ती देखील ऑरेंज ड्रेस घातलेल्या मुलीला मारायला सुरुवात करते. याच वेळी काही मुली मध्ये पडून त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. तरीही दोघी ऐका.यला तयार होत नाहीत. दोघी अक्षरश: एकमेकींना जमिनीवर पाडतात. सध्या या वादामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी धक्का बसला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Kalesh b/w Girls inside DU Campus: pic.twitter.com/p3DBa1DGRE
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 27, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, हा व्हिडिओ तरुणींच्या घरच्यांना पाठवला पाहिजे, तर दुसऱ्या एका युजरने डब्ल्यू डब्ल्यू फाईट पेक्षा ही फाईट पाहायला जास्त मज्जा येते असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.