Viral Video of Tiger Hunting monkey video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. अनेकदा जंगली आणि हिंसक प्राण्यांच्या शिकारीचे अनेक व्हि़डिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक माकड आणि वाघाच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
वाघ किती हिंसक प्राणी आहे हे सर्वांना माहिती आहे. अनेकदा वाघाच्या पंज्याच्या एक फटक्यात समोरचा ढेर होतो. त्याची डरकाळी जरी ऐकली तर अनेकजण भितीने थरथर कापू लागतात. केवळ लहान सहान प्राणी नाही तर, अनेकदा सिंह देखील वाघाला घाबरतात. परंतु व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका माकडाने सिंहाची चांगलीच फजिती केली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक माकड वाघाला आव्हानं देत असते. अशा वेळी वाघ देखील शिकार करण्यास धाव घेतोच. तुम्ही पाहू शकता की, वाघ माकडाची शिकार करत असतो. या नादात तो माकडाच्या मागे झाडावर देखील चढतो. आता झाडावर सहजतेने उड्या मारणे हे माकडाच्या गुणांगी असतेच. माकड देखील वाघाला चखमा देण्यासाठी झाडाच्या अगदी हलक्या फुलक्या फांदीवर चढतो.
दरम्यान वाघ देखील त्याच्या मागे जातो, एक क्षण असा येतो जेव्हा वाघ खाली पडणार असतो. पण तो पुन्हा स्वत:ला सावरत फांदीवर चढतो. माकड देखील त्याला अजून उंचावर निमुळत्या शेड्यांवर घेऊन जातो. याच वेळी माकड त्याच्या हाती लागण्याचे नाटक करतो. वाघ माकडावर हल्ला करणारच असतो, इतक्यात माकड दुसऱ्या झाडावर उडी मारते. दरम्यान फांदी अगदी हलकी असल्याचे वाघाच्या वजनाने तुटते आणि वाघ खाली पडतो. दोन्ही प्राणी हार न मानता परिस्थितीशी झुंज देत असल्याचे आपल्याला या व्हि़डिओत पाहायला मिळते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @thebigcatsempire या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. सध्या हा व्हि़डिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे. अनेकांनी कोणालाही कमी समजू नये असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.