जंगल तोड थांबवा! भर चौकात झाडाच्या वेषात तरुणाने माणसांना दाखवला आरसा, Video Viral (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम/@ashish_raipat)
फेब्रुवारीत हैदराबाद विद्यापीठीच्या शेजारील 400 एकर वनजमिनींचा लिलावर तेलंगणा सरकारने केला होता. या ठिकामी आयटी पार्क बांधण्यासाठी हा लिलाव करण्यात आला होता. या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थींनी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. त्यानंतर 3 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायलयाने जंगल तोड थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला. या दरम्यान सोशल मीडियावर जगंलतोडीची अनेक व्हिडिओ, छायाचित्रे व्हायरल झाली होती. या व्हिडिओंमधून प्राणी, पक्षी, आपल्या निवासातून बाहेर पडताना दिसत होते. मोठ्या प्रमाणात जगंल तोड, वृक्ष तोड केली जात होती. प्राणी पक्षी मानवी वसाहतींमध्ये फिरताना दिसत होते.
या व्हिडिओंमुळे जंगलतोडीला जगभरातून विरोध केला जाऊ लागला. नागरिकांसह, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक लोकांकडून तीव्र विरोध होऊ लागला. याच पार्श्वभूमीवर गचिबोली वनक्षेत्रातील जंगलतोड थांबवण्याचा आदेश सर्वोच्च न्यालयाला दिला होता. दरम्यान एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओत आशिष रायपत नावाच्या एका व्यक्तीने झाडांचे रुप धारण करुन एक रस्त्यावर उभा राहिला आहे. यामध्ये त्याने हातात एक बोर्ड घेतला आहे, ज्यावर “मेरे घरों को मत उजाडो, मै एक जीव हूं, मे कहा जाऊंगा” म्हणजे माझे घर तोडू नका, मी कुठे जाणार, मीही तुमच्यासारखाच एक जीव आहे असे म्हटले आहे. या व्हिडिओच्या कॅप्श्नमध्ये आशिष रायपदत ने ‘Save Tree! Save Life’ असे म्हटले आहे . सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ आशिष रायपतने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम ashish_raipat अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी म्हटले आहे की, हे फक्त म्हणण्यापर्यंत आहे, करत कोणी नाही, तर काहींनी मित्रा आम्ही देखील तुझ्या पाठीशी ओहोत असे म्हटले आहे. काही लोकांनी यावर रडण्याचा इमोजी शेअर केला आहे. तर काही लोकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांनी तू खूप चांगले काम करत आहेस असे म्हटले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.