Viral Video Of Two old lady fight video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ दर सेकंदाला व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड मारामारी यांसारखे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मारामारीचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. महिला, मुली कधीही कुठेही भांडायला सुरुवात करतात. आता यामध्ये काही आजींबाईंचे देखील व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. हे व्हिडिओ इतके क्यूट आहेत की, पाहातच रहाल. सध्या असचा दोन आजीबाईंचा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक आजीची घराच्या दरवाज्यात उभी आहे. तर तिथूनच आणखी एक आजी आपल्या नातीसोबत जात आहे. याचवेळी कोणत्या तरी विषयावरुन अचानत दोघींमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु होते. त्यानंतर हा शाब्दिक वाद हाणामारीत बदलतो. बाहेर असलेल्या आजी आपल्या नातीला काठी आणून द्यायला सांगतात. नातीने काठी आणून देताच त्या काठीने मारायची धमकी दुसऱ्या आजीबांईंना देतात. मग त्या आजी देखील आपली काठी घेऊन त्यांना दम द्यायला लागतात. दोघीही एकमेकींना फक्त काठी दाखवत आणि शिवगाळ करत असतात. वाद कोणत्या कारणावरुन झाला हे लक्षात आलेले नाही. पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर @briefchaat या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने ‘WWE पेक्षा ही फाईट बघायला मजा येते,’ तर दुसऱ्या एका युजरने ‘आजीबाई जरा हळुच.’ आणखी एकाने नादी नाही लागायचे हा असे प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती नाही. पण हा क्यूट व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.