viral video old ladies dance on EK NO Tuji Kambar Song video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. डान्सचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेत थिरकताना दिसतात. कधी रस्त्यावर डान्स, करताना तर कधी मेट्रोमध्ये, तर कधी उंच झाडाच्या शेंड्यावर चढून लोक डान्स करत असतात. त्यात काही गाणी खूप ट्रेंड होतात. अशा गाण्यांवर सेलिब्रिंटींपासून ते सामान्यांपर्यंत सर्वच व्हिडिओ बनवतात.
गेल्या काही काळात गुलाबी साडी, तौबा तौबा, शेकी शेकी अशी अनेक गाणी ट्रेंड होत आहे. या गाण्यांवर अनेकजण व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. या गाण्यांवर तुम्ही देखील एखादी रिल नक्कीच बनवली असे. अशातच काही आजींनी देखील अशाच एका गाण्यावर भन्नाट असा व्हिडिओ बनवला आहे. सध्या या वयोवृद्ध महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
यामध्ये तुम्ही पाहू शकता की, गेल्या काही दिवसांपासून ट्रेंड होणार कतल गाणे वाजत आहे. या लाखो लोकांनी रिल्स बनवले आहे. व्हायरल व्हिडिओ काही वयोवृद्ध महिलांनी यावर डान्स केला आहे. यामध्ये पाच वयोवृद्ध महिला कतल गाण्यावर थिरकल्या आहे. सर्व आजींनी गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. सर्वजणी गोंडस अशा स्टेप्स करत गाण्यावर डान्स करत आहेत. या महिलांना नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवर @shantai_second_childhood या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत डान्स करणाऱ्या आजी वृद्धाश्रमात राहतात. पण हा व्हिडिओ नेमका कोणत्या वृद्धाश्रमातील आहे याची माहिती नाही. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी कौतुकास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने किती गोड दिसत आहेत सगळ्या असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने जबरदस्त आणि नावाला साजेसं- second childhood असे म्हटले आहे. आणखी एकाने खूपच सुंद असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.