Passengers loot belongings from a clothes seller from a running train
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, डान्स, भांडण यासांरखे अनेक रिल्स व्हायरल होत असतात. अलीकडे मारामारीचे, खूनांचे, अपघातांचे, चोरीच्या घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा हे व्हिडिओ पाहून राग अनावर होतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रेल्वे स्थानकावर चारोच्या आणि लुटमारीच्या घटना सतत घडत असतात. चोर नेहमीच योग्य संधीची वाट पाहतात आणि संधी मिळताच सामान घेऊन फरारा होतात. यामुळे अशा वेळी आपल्या वस्तूंची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. सध्या असाच एक चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये स्थानकावर उभे राहून कपडे विकत असताना त्याच्या निष्काळजीपणामुळे चोरी झालेली आहे. धावत्या ट्रेनमधून काही लोकांनी विक्रेत्याचे सामान चोरले आहे.
नेमकं काय घडलं?
सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा रेल्वे प्लॅटफॉर्मवर शर्ट हातात घेऊन प्रमोशनचे व्हिडिओ बनवत आहे. तो म्हणत आहे की, मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी प्रीमियम दर्जाचे शर्ट घेऊन आलो आहोत, हे शर्ट बाजारात खूप ट्रेंडिंग आहेत. यात दरम्यान एक धक्कदायक घटना घडते. प्लॅटफॉर्मवरुन एक ट्रेन वेगाने धावत चालेली असते. काही प्रवासी ट्रेनच्या दरवाज्यात उभे असतात. त्यातील एका डब्यातील व्यक्ती विक्रेत्याच्या हातातून शर्ट ओढून घेतो, त्याच वेळी दुसऱ्या डब्यातील व्यक्ती देखील आणखी एक टीशर्ट चोरतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हातातील टी शर्ट चोरी गेल्याने मुलाला काही कळत नाही. तो ट्रेनच्या मागे धावतो मात्र, ट्रेन भरधाव वेगात निघून जाते. या घटनेला पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे, मात्र काहींना हसू देखली आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @sarcasticschool_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भाई! तुमचा प्रीमियम शर्ट घेतला आहे, तर दुसऱ्या एका युजरने निष्काळजीपण नडला, कोणी सांगितले होते ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवायला. आणखी एका युजरने म्हटले आहे की, दुसऱ्यांच्या मेहनतीचे नुकसान करायला अशा लोकांकडून शिकावे. सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.