कुठून येते इतकी क्रूरता! तरुणाने वृद्ध व्यक्तीला स्कूटीला बांधले अन्...; VIDEO पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड यांशिवाय अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अलीकडे मारामारीचे, खूनांचे, अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा हे व्हिडिओ पाहून राग अनावर होतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण या व्हिडिओमध्ये एक तरुणाने वृद्ध व्यक्तीसोबत असे कृत्य केले आहे की, याचा विचार देखील अशा लोकांच्या मानात कसा येतो असा प्रश्न पडेल. तरुणाने वृद्धाला स्कूटीला बांधून असे काही केले आहे की, व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओतील दृश्याने भितीने तुमचे डोके सुन्न तर होईलच पण त्या तरुणावर संताप येईल.
स्कूटरला बांधले अन् फरपटत नेलं…
व्हायरल होत असेलल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणाने वाऱ्याच्या वेगाने स्कूटर पळवत आहे. क्रूरतेची बाब म्हणजे त्याच्या स्कूटरच्या मागे एका वृद्ध व्यकतीला बांधले असून तो त्यांना फरपटत घेऊन जात आहे. रस्त्यावरील खड्डे, दुभाजक याकडे दुर्लक्ष करत तरुण फक्त स्कूटर पळवत आहे. यामुळे आजोबांना गंभीर दुखापत झाली असेल. मात्र, त्या हैवानाला याचे काहीही वाटत नाही. ही धक्कादायक घटना भर दिवसा घडत असून आजूबाजूल अनेक गाड्या ये-जा करत आहेत. मात्र, कोणीही गाडी थांबवलेली नाही. त्याच रस्त्यावरुन जाणाऱ्या एकाने याचा व्हिडिओ शूट केला याचे वेळी कॅमेरा पाहून तरुण थांबला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Man being dragged behind a scooter on Bengaluru’s Magadi road
Knowing that condition on Bangalore road… I fear serious injury pic.twitter.com/oMEU3hB8Pb
— Emon Mukherjee (@EmonMukherjee21) January 18, 2023
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर EmonMukherjee21 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. स्कूटरचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्याने स्कूटर थांबवल्यावर आजोबा धडपडत उठून त्यांचे आभार मानतात. त्यांच्यामुळे त्यांचा जीव वाचला म्हणतात. वृद्धाच्या गाडीने स्कूटरला धडक दिल्याने अपघात झाला आणि तरुणाने त्यांना रागाच्या भरात फरपटत नेले. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, याला चाबकाने फटके दिले पाहिजेत, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, लोकांमध्ये इतकी क्रूरता कुठून येते. सध्या हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.