लॉकअप न तोडता आरोपी फरार; पोलिसांनी दाखवला डेमो
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. सध्या असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. अनेकदा असे व्हिडीओ समोर येतात जे पाहिल्यानंतर हसावे की रडावे हे देखील कळत नाही. तुम्ही अनेक गोष्टींचे डेमो पाहिले असतील. रील कशी बनवायचे याचा डेमो, फोटो एडिंटगचा डेमो, तर एखादे क्राफ्ट डेमो तुम्ही पाहिला असेल. पण सध्या एक अजब डेमोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक आरोपी लॉकअपमधून कुलूप न तोडता कसा बाहेर आला हे दिसत आहे. हा डेमो त्याने पोलिसांसमोर केला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पिंपरी येथील चाकण पोलिस स्टेशनचा असल्याचे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कुलूप न तोडता आरोपी बाहेर कसा आला?
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पोलिस स्टेशनमधील लॉकअपच्या बाहेर रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, काही पोलीस लॉकअपच्या बाहेर उभे आहेत. काही आरोपी आत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. एक आरोपी कुलूप न तोडता बाहेर येतो. यामागचे कारण म्हणजे आरोपी अत्यंत सडपातळ असून, त्याचा फायदा घेत त्याने स्वत:ला लॉकअपमधून बाहेर काढले आहे. लॉकअपच्या दोन रॉडमधून तो बाहेर पडण्यात यशस्वी झाला ज्यामध्ये त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त जागा होती. पोलिसांसमोर दिलेल्या या डेमोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूप जुना आहे जो सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – इवलासा साप कसा भल्यामोठ्या गायीला गिळतो? एकदा पहाच, Viral Video पाहून व्हाल शॉक
व्हायरल व्हिडीओ
Police Make SLIM accused give Live Demo of how he escaped from Lock Up from Chakan Police Station of Pimpri-Chinchbad by Squeezing out of the Lock up Bars 🤦♀️😂 pic.twitter.com/WP0NNDn0Kx
— Rosy (@rose_k01) March 22, 2022
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @rose_k01 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 2022 मध्ये पोस्ट केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले आहे की, ‘गरज ही शोधाची जननी आहे.’ तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ‘बारीक असणे पण कधीकधी फायदेशीर ठरू शकते.’ तिसऱ्या एकाने म्हटले आहे की, ‘हे मेंटोस जीवन आहे.’ तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘हा मुलगा खूप पुढे जाईल.’