सांताक्लॉजचा मुंबई लोकलच्या गर्दीतून प्रवास करताना
आज सर्वत्र ख्रिसमस सणाचा उत्साह पसरलेला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सांताक्लॉजचे वेगवेगळे रुपात दिसत आहेत. सध्या एका खास व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ आहे मुंबईच्या लोकल ट्रेनचा आहे. यामध्ये सांताक्लॉज चक्क ट्रेनच्या दरवाजावर उभा राहून लोकलचा प्रवास करताना दिसत आहे. मुंबई लोकलसाठी ओळखल्या जाणाऱ्या गर्दीच्या प्रवासात सांताक्लॉजचे असे दर्शन हे लोकांसाठी खूपच अनोखे आणि मजेशीर आहे.
मुंबईच्या लोकमधून सांतक्लॉजचा प्रवास
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सांताक्लॉज बनलेली व्यक्ती ट्रेनच्या दरवाजावर उभी आहे. ट्रेन सुरू असताना प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या लोकांना बोट दाखवत ती व्यक्ती खट्याळ हावभाव करत आहे. यामुळे पाहणाऱ्यांना हसू आवरत नाही. प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांसाठी हा एक अनोखा आणि मजेशीर अनुभव ठरला. अशा प्रकारे ख्रिसमसच्या निमित्ताने मुंबईच्या गर्दीतही सांताक्लॉज लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम करत होता. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडीओ चर्चगेट-विरार लोकल ट्रेनमधील असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, सांताक्लॉजच्या वेशातील ही व्यक्ती रवी नायर असल्याचेही अनेकांनी आपल्या कमेंट्समध्ये सांगितले आहे. unexplored_vasai नावाच्या या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, आणि तो पाहून अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “सांताक्लॉज निघाला चर्चगेटला,” तर दुसऱ्या एकाने, “हे फक्त मुंबईतच शक्य आहे.” असे म्हटले आहे. आणखी एकाने म्हटले आहे की, “सांता वे टू सांताक्रूझ,” तर काहींनी थट्टामस्करी करत म्हटले की, “सांता जर सेकंड क्लासमधून गेला असता, तर त्याची चांगलीच हजामत झाली असती.”
मुंबईकरांच्या आयुष्यातील धावपळीच्या जगात सांताक्लॉजचा हा खट्याळ अंदाज काही क्षणांसाठी का होईना, पण लोकांना आनंद आणि हसू देऊन गेला. अशा व्हिडीओजमुळे सणांचा आनंद द्विगुणित होतो आणि मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही ख्रिसमस सणाचा खास रंग अनुभवायला मिळतो. व्हिडिओला पोस्ट केल्यानंतर लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ सध्या अनेकांच्या पसंतीस पडत आहे. अनेकांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर केले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.