तुफान राडा! शाळकरी मुलींची बेल्टनं सटासट हाणामारी; पाहून मुलांनी लुटला आनंद, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगणे कठीण आहे. रोज वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. भांडणांचे तर अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. कधी रस्त्यावर तर कधी बसमध्ये, रेल्वेत. यामध्ये तरुणींच्या भांडणाचे तर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या शाळकरी मुलींच्या मारामारीच्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाच सहा मुली एकमेकींना बेल्टने सटासट मारताना दिसत आहेत.
हा प्रकार पाहणाऱ्या मुलांनी एकप्रकारचा आनंद लुटल्याचे दिसते आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून हाणामारीचा हा प्रकार खरोखरच चिंताजनक असून तो सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. हा प्रकार रसत्यावर सुरु असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अनेक मुले मुली घोळका करुन भांडणे सुरु असलेल्या ठिकाणी जमलेले आहे.
व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, पाच सहा मुली एकमेकींनी जोरात पट्ट्याने मारत आहेत. तसेच एकमेकींची केस देखील उपटत आहेत. तर या ठिकाणी अनेक शाळकरी मुले-मुली हा प्रकार पाहत असून याचा आनंद घेत आहेत. मुले तर अगदी आनंदात नाचत आहे. असे वाटत आहे की, जणू कोणती मारामारीची स्पर्धाच सुरु आहे. मात्र, मुलींचा वाद नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या मुलांनी त्यांचा संघर्ष थांबवण्याऐवजी त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रकार केला आहे. यामुळे संपूर्ण घटनेचे गांभीर्य वाढले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @_.palshab._ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या प्रकाराची खिल्ली उडवली, तर काहींनी तीव्र चिंता व्यक्त केली. मुलांच्या वागणुकीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक शिक्षणाचा अभाव असल्याचे बोलले जात आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.