महिलेचा रस्त्याच्या मधोमध रील बनवण्याचा स्टंट ( फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अनेकदा मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडे तर सोशल मीडियाच्या आकर्षणाने लोकांचे वागणे पूर्णतः बदलत चालले आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि व्हायरल होण्यासाठी लोक कधी-कधी असे कृत्य करतात की ते पाहून डोक्याला हात लावावा लागतो. असाच एक प्रकार नुकताच घडला आहे, यामध्ये एका महिलेने रस्त्याच्या मधोमध उभे राहून रील बनवण्याचा स्टंट केला.
हा प्रकार इतका धोकादायक आणि जबाबदारीशून्य आहे की त्याने इतर लोकांच्या जीवनालाही धोका निर्माण होऊ शकतो. रस्त्याच्या मधोमध वाहतूक सुरू असताना, ही महिला गाड्यांना रील बनवण्यात व्यस्त आहे. व्हिडिओमध्ये ती काही ठराविक नृत्याच्या हालचाली करताना दिसत आहे, आणि गाड्यांचे हॉर्न वाजत असतानाही तिला त्याचा काहीही फरक पडत नाही. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
नेमकं काय करत आहे महिला?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरुन असंख्य वाहने ये-जा करत आहेत. याचवेळी एक महिला रस्त्याच्या मधोमध रील बनवत आहे.य यासाठी तिने मधोमधे एक मोठी खूर्ची आणि लहान खूर्ची ठेवून मोबाईल सेट केलेला आहे. आणि ती डान्स करत आहे. या महिलेला कोणतीही भिती नाही. ती बिनधास्तपण रस्त्याच्या मधोमध उभे राहून डान्स करत रील बनवण्यात व्यस्त दिसत आहे. हा सर्व प्रकार तिथूनच जाणाऱ्या एका नागरिकाने रेकॉर्ड केलेला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @truescoop या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेतांनी यावर तीव्र टिका केली आहे. “लोकांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही गोष्टीची काळजी वाटत नाही का?” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटिझन्सनी व्यक्त केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “हे काय पाहण्यास मिळत आहे” .
दुसऱ्या एका युजरने बाई हा काय प्रकार असे म्हटले आहे. आणखी एकाने काकूंचा नाद नाय करायचा असे म्हटले आहे. मात्र, रस्त्यावर असे प्रकार करताना केवळ स्वतःचा जीव धोक्यात येतो असे नाही, तर इतरांनाही अडथळा निर्माण होतो. वाहतूक कोंडी, अपघात, आणि काही वेळा जीवितहानीसारख्या गंभीर परिणामांना या प्रकारामुळे सामोरे जावे लागते. अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.