viral video shocking incident male teacher hugs female student video goes viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळले याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ पाहायला मिळतात. याशिवाय अनेक धक्कादायक आणि संतापजनक असे व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एका शिक्षक विद्यार्थीनीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. खरं तरं शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं हे एका गुरु-शिष्याप्रमाणे असते. गुरु-शिष्याचं नातं हे पवित्र असतं.
आई-वडिलांनंतर शिक्षकच विद्यार्थ्याच्या आयुष्याला आकार देतो. शिक्षकाकडून मिळालेली विद्येची शिदोर आयुष्यभर आपल्या कामी येते. पण अलीकडच्या काळात शिक्षक विद्यार्थ्याच्या या पवित्र नात्याला कालीमा फासणाऱ्या गोष्टी घडत आहेत. शिक्षकच भक्षक बनला असून विद्यार्थ्याने देखील मर्यादा ओलांडली आहे.
नेमकं काय घडलं?
या व्हिडिओत एका विद्यार्थीनीबरोबर शिक्षकाने गैरवैतर्न केलेच आहे पण विद्यार्थीनेही जे केले पाहून अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक शिक्षक स्टाफरुमध्ये आहेत. ते आपल्या कामात व्यस्त आहेत. याचवेळी एक विद्यार्थीनी तिथे येते. तिला पाहाताच शिक्षक तिला मिठी मारतात आणि धक्कादायक बाब म्हणजे ती विद्यार्थीनी यावर कोणताच आक्षेप घेत नाही आणि सरांना मिठी मारते. ही संपूर्ण घटना स्टाफरुममधील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मात्र ही घटना कुठे घडली याबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @law_of_marriage या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी संतापजनक अशी प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “आई-वडिल कोणावर विश्वास ठेवतील. मुली कुठेही सुरक्षित नाहीत असे म्हटले आहे. एका युजरने, अरे काय चाललंय तरी काय? असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या एकाने एवढी हिम्मत कुठून येते या मुलींच्यात असे म्हटले आहे. तर अनेकांनी शिक्षकांना ट्रोल केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.