viral video shocking sick uncle drinking alcohol video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. दारु पिणाऱ्यांचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेक लोकांना दारु आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे माहित आहे. परंतु तरीही लोक दारु पिऊन गोंधळ घालतात. सोशल मीडियावर मद्यपान करणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. कधी दारुच्या नशेत कोमी विजेच्या खांबवर चढलेले असते, तर कधी कोणी प्राण्याशा पंगा घेताना दिसते. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. नशेत कधी कोण काय करेल याचा नेम नसतो.
काही लोक दारुच्या नशेत असे काही करतात की, पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक व्यक्ती दारुपुढे आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करतो. थोड्या वेळाच्या आनंदासाठी एक काका धक्कादायक कृत्य करतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक काका रस्त्याच्या कडेला बसलेले दिसत आहेत. त्यांच्या नाकात एक नळी घातलेली आहे. त्याला एक सिरेंज देखील जोडलेली आहे. यामुळे काकांना लिक्यिड फूडचे सेवन करता येईल.
तुम्ही पाहू शकता की, काकांच्या हातात दारुने भरलेला एक ग्लास दिसत आहे. त्यानंतर काका ग्लासमदील दारु सिंरेंजमध्ये ओतात. त्यामधून दारु सिरेंजला जोडली जाते आणि थेट त्यांच्या नाकातून पोटात जाते. काकांचे हे कृत्य पाहून अनेकजणांना धक्का बसतो. आजारी असूनही काका दारुचे व्यसन करत आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्य प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Chacha akhri khwaish poori karte huye 💀💀 pic.twitter.com/8fUResiHbb
— Harry (@hariom5sharma) May 21, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटऑर्म एक्सवर @hariom5sharma या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने वाह, काका असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने काका त्यांच्या शेवटची इच्छा पूर्ण करत आहेत. अशी प्रतिक्रिया दिली आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे की, काकांनी काय डोकं चालवलंय, एकच नंबर. अशी विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.