'एक नंबर तुझी कंबर', मराठी गाण्यावर मनमोहक अंदाजात थिरकली विदेशी तरुणी ; Video तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. रोज एक वेगळा ट्रेंड सुरु होतो. अशातच जगभरातील लोक त्या ट्रेंडवर व्हिडिओ बनवतात. काही ट्रेंड इतके मजेशीर असतात हूसन हसून पोटात दुखून येते. तर काही गाण्यांवर भन्नाट अशा डान्सचे ट्रेंड सुरु होतात. आपल्या भारतातील तर अनेक मजेशीर गाणी ट्रेंड होतात. सध्या असेच एक मराठी गाणे गेल्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. एक नंबर तुजी कंबर हे गाणे सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. या गाण्यावर केवळ सामान्य व्यक्तीच नव्हे तर सेलिब्रिटी लोकही थिरकले आहे. हे गाणे फक्त महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात लोकांच्या आवडीचे बनले आहे.
सध्या या गाण्यावर एका विदेशी तरुणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणी अगदी मनमोहक रुपात आहे. एक नंबर तुझी कंबर या गाण्यावर तिने डान्स केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका विदेशी तरुणी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये विदेशी तरुणीने अत्यंत मनमोहक अंदाजात डान्स केला आहे. तिच्या स्टेप्स अगदी जबरदस्त आहे. तिच्या कंबर हालवण्याची स्टेप्स अनेकांना आवडली आहे. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तरुणीचे कौतुक केले आहे. एका युजरने खूपच छान डान्स केला असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका, एक नंबर तुझी कंबर, भारीच डान्स असे म्हटले आहे. अनेकांनी हार्टचे इमोजी देखील शेअर केले आहेत.
यापूर्वी देखील अशी अनेक गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. यामध्ये गुलाबी साडी, नऊवारी साडी, तांबडी चामडी, अशी अनेक गाणी विदेशात लोकप्रिय ठरली आहे. सध्या एक नंबर तुझी कंबर हे राणे लोकांच्या पसंतील पडत आहे. हा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.