viral video small child cries to father for marriges video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स रिल्स यांसारखे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण व्हिडिओ बनवत असतात. यामध्ये लहान मुलांचे तर अनेक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. लहान मुले कधी काय बोलतील, काय करतील, कोणत्या गोष्टीचा हट्ट करतील हे सांगणे कठीण आहे. असाच एक हैराण करणार व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका चिमुकल्याने आपल्या वडिलांकडे एकाच गोष्टीचा हट्टा केला आहे. चिमुकल्याने वडिलांना हैराण करुन सोडले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही. यामध्ये चिमुकला आपल्या वडिलांकडे लग्नासाठी हट्ट करत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला आपल्या वडिलांकडे ढसा ढसा रडत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका छोट्या दुकानात त्याचे वडिल काम करत आहे. याच वेळी चिमुकला मोठ्या मोठ्याने रडत आहे. रडत रडत चिमुकला लग्न करायचे म्हणत आहे. बाबा, काय कारायचंय तुला? लग्न? असे विचारतात. तर यावर मुलगा हो बोलतो आणि उड्या मारत लग्न लग्न म्हणत असतो. त्याचे बाबा त्याला घरी जाण्यास सांगतात पण चिमुकला लग्नाचा हट्ट घेऊन बसलेला असतो. तो कोणाला तरी फोन करायला सांगतो, यावर त्याचे बाब फोन केला म्हणून म्हणतात. पण चिमुकल्याला त्यांच्यावर विश्वास बसत नाही. तु खोट खोटे फोन केलास ना असे म्हणतो. आणि लग्न करायचंय लग्न करायचंय असे म्हणत असतो. सध्या या व्हिडिओने नेटकऱ्यांच्या लक्ष वेधले असून अनेकांना त्यांचे हसू आवरणे कठीण झाले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @starmaharashtrachaofficial या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मेजशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “पैसे लागतात त्याला” असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने “आताच लहान आहे तर रडून लग्न करून घे नाही तर मोठा झाला की रडला तरी लग्नाला मुलगी नाही मिळणार, खूप मुल रडतंय बघ की असे म्हटले आहे.” आणखी एकाने “माझ्या मित्राचा पण 30 वय झालं आहे, तो पण असंच करतो असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.