Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नी रडत राहिली पण पतीने शोरूमसमोरच स्वतःच्या ई-रिक्षाला लावली आग; जोधपुरातील धक्कादायक प्रकारचा Video Viral

E-Rikshaw Set Fire : राजस्थानमधील जोधपूरमध्ये ग्राहक–कंपनी वादाचा संतापजनक कळस पाहायला मिळाला. कंपनीने कम्प्लेंट ऐकली नाही म्हणून चालकाने चक्क शोरूमसमोरच आपली ई-रिक्षा पेटवून दिली.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 31, 2025 | 11:34 AM
पत्नी रडत राहिली पण पतीने शोरूमसमोरच स्वतःच्या ई-रिक्षाला लावली आग; जोधपुरातील धक्कादायक प्रकारचा Video Viral

पत्नी रडत राहिली पण पतीने शोरूमसमोरच स्वतःच्या ई-रिक्षाला लावली आग; जोधपुरातील धक्कादायक प्रकारचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बॅटरी खराब असल्याची तक्रार वारंवार करूनही कंपनीने दखल घेतली नाही.
  • संतप्त रिक्षा चालकाने रागात शोरुमसमोरच ई-रिक्षाला आग लावली.
  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच युजर्सने कंपनीवर संताप व्यक्त केला आहे.
राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने शोरूमसमोरच त्याच्या ई रिक्षाला आग लावली आणि ही संपूर्ण दृश्य आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. त्याने प्रथम आपल्या रिक्षाला शोरूमसमोर त्याच्या ईव्ही ऑटोरिक्षावर पेट्रोल ओतले आणि नंतर त्याने रिक्षाला आग लावली. त्याची पत्नी हे सर्व दृश्य पाहून रडू लागली आणि तिने या घटनेचा व्हिडिओही शूट केला. घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ही रिक्षा बजाज कंपनीची असून चालकाने कंपनीवर गंभीर आरोप देखील केलेले आहेत. जेव्हा कंपनीने चालकाच्या कोणत्याही तक्रारीला उत्तर दिले नाही तेव्हा त्याने रागात येऊन शोरूमसमोरच रिक्षाला आग लावली. चला या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

धुरंधरच्या FA9LA गाण्यावर पाकिस्तानच्या बलोच लोकांनी केला जबरदस्त डान्स; स्टेप्स पाहून युजर्स झाले इम्प्रेस; Video Viral

काय आहे प्रकरण?

रिक्षाचालक मोहनने आरोप केला की त्याच्या ऑटोमध्ये बॅटरीचा प्रॉब्लेम झाला होता. वारंवार तक्रारी करूनही कंपनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत नव्हती. एकदा तर मोहनने काही दिवसांपूर्वी, त्याची ई-रिक्षा गाढवाच्या मदतीने सर्व्हिस सेंटरमध्ये ओढून नेली होती. पण तरीही कंपनीने त्याला कोणतीही मदत केली संतापात त्याने आपल्या ई-रिक्षाच आग लावून टाकली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. जोधपूरच्या बजाज शोरूमबाहेर, मोहनने त्याच्या ऑटोवर पेट्रोल ओतले आणि आग लावली. यावेळी त्याची पत्नीही त्याच्या सोबत होती, जिला हे सर्व पाहताच अश्रू अनावर झाले.

शोरूम के बाहर अपना ही ई-रिक्शा फूंका
जोधपुर में बजाज शोरूम के बाहर एक युवक मोहन सोलंकी ने खुद के ई-रिक्शा को पेट्रोल छिड़ककर आग लगा दी। इस दौरान मोहन की पत्नी दहाड़ें मार मार कर रोती रही। भाई वीडियो बनाता रहा।
मोहन का आरोप है कि ई रिक्शा की बैटरी खराब थी और कोई सुनवाई नहीं हो… pic.twitter.com/l5v9Ry58sg — Arvind Chotia (@arvindchotia) December 30, 2025

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral

मोहनचा आरोप आहे की ई-रिक्षाची बॅटरी खराब होती आणि तो अनेक दिवसांपासून त्याबद्दल तक्रार करत होता, पण कोणीही ऐकत नव्हते. ऑटोचा मायलेज कमी झाला होता. कंपनीकडून योग्य मदत न मिळाल्याने संतप्त झालेल्या मोहनने ऑटो पेटवून दिला. दुसरीकडे, बजाज शोरूम ऑपरेटर हरीश भंडारी यांनी मोहनच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले आहे की, तपासणीत सर्व काही ठीक असल्याचे दिसून आले होते पण तरी मोहन त्याच्यावर ई-रिक्षा बदलण्यासाठी अनावश्यक दबाव आणत होता. दरम्यान घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच युजर्सने मात्र कंपनीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिले आहे, “मी त्यांची उत्पादने खरेदी करणे बंद केले आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बॅटरी खराब होती, आणि जर प्रकरण ऐकले जात नव्हते, तर बॅटरी विकत घेऊन ती दुरुस्त करता आली असती असे तिला जाळून टाकणे फार नुकसानदायक आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “एकदा गाडी विकली की, सर्व शोरूम मालकांची परिस्थिती सारखीच असते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Video viral jodhpur driver sets his e rickshaw on fire in front of bajaj showroom viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • Bajaj
  • Rikshaw driver
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
1

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
2

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
3

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

‘…आणि यांना हवाय विकसित भारत’! लोकांनी लाज सोडून थेट सरकारी सिमेंटच चोरलं; लाजिरवाणा VIDEO VIRAL
4

‘…आणि यांना हवाय विकसित भारत’! लोकांनी लाज सोडून थेट सरकारी सिमेंटच चोरलं; लाजिरवाणा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.