
spider man selling cucumber on train video viral
वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ
स्पायडरमॅन हा तुमचा आमचा सर्वांचा सुपरहिरो आहे. एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उड्या मारत असतो. संकटात अडकलेल्या लोकांची मदत करत असतो. यामुळे अनेकांना स्पायडरमॅन खूप आवडतो. सध्या या स्पायडरमॅनचा ट्रेनमध्ये काकडी विकतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओचा नेटकऱ्यांनी आनंद लुटला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्ती स्पायडरमॅनच्या वेशात असून ट्रेनमध्ये चढत आहे. त्याच्या हातात एक टोपली आहे. या टोपलीमध्ये काकडी दिसत आणि त्यावर टाकायचे मसाले-मीठ दिसत आहे. ट्रेनमध्ये जाऊन स्पायडनमॅन काकडी विकताना दिसत आहे. एका व्यक्तीने त्याच्याकडून काकडी खरेदीही केली आहे. हा व्हिडिओ सोेशल मी़डियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @princetegade या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. एका नेटकऱ्याने उडून पैसा मिळत नाही, पोटासाठी कष्ट करावे लागतात असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने नुसते जाळे टाकून नाही चालत , पोटा पाण्यासाठी कमवावं लागतं राव, असे म्हटले आहे. आणखी एकाने कोकणचा स्पायडया अशी कमेंट केली आहे. तर एकाने हे विदेशात नाही गेलं पाहिजे नाहीतर वाद होतील, असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मी़डियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.