viral video small child pulling lion's tail netizens got angry video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ दर सेकदाला व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ असतात. शिवाय, प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळातात. अलीकडे प्राण्यांना पाळण्याशी संबंधित छंदांमध्ये बदल झाले आहेत. मांजर, कुत्रे पाळणे आता सामान्य झाले असून लोक विविध प्रकारचे प्राणी-पक्षी पाळत आहेत. यामध्ये सिंह, वाघ यांसारखे अनेक हिंसक प्राणी लोक पाळत आहेत. लोक पाळीव प्राण्यांशिवाय जंगली आणि हिंसक प्राण्यांना पाळू लागले आहेत.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका कुटुंबाने सिंहाला पाळीव बनवून ठेवले आहे. मात्र, त्याच्यासोबत घरातील चिमुकल्या सदस्याने गंभीर कृत्य केले आहे. यामुळे हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका सिंहाला साखळने घराच्या दरवाज्यात बांधून ठेवले आहे. याचवेळी एक चिमुकला सिंहाची शेपटी ओढताना दिसत आहे. तसेच आणखी एक माणूस त्या चिमुकल्याला सिंहाची शेपटी सोडण्यास सांगत आहे, तेही हसत हसत. तरीही चिमुकला शेपटी ओढत आहे. याच वेळी चिमुकला असचानक खाली पडतो, यानंतर व्हिडिओ संपला असून पुढे काय घडले याबाबत कोणतीही माहिती नाही. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @asifsherowala या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, ही क्रूरता आहे, तर दुसऱ्या एकाने अशा लोकांना पाळीव प्राण्यांना पण पाळण्याची परवानगी नसावी. तिसऱ्या एका युजरने कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या या व्हिडिओला 23 हजाराहूंन अधिक व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.