घृणास्पद कृत्य! डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केली लघवी: सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच उडाली खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळातात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या एक धक्कादायक आणि अश्लील कृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. हा व्हिडिओ आस्ट्रेलियातील असून यामध्ये एक तरुण लिफ्टमध्ये लघवी करताना दिसत आहे. लिफ्ट उंच बिल्डिंगध्ये खाली-वर जाण्यासाठी वापरली जाते. यादरम्यान कोणाला शौचास जायचे झाल्यास लिफ्ट फ्लोअरवर थांबल्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. पण या तरुणाने संतापजनक असा प्रकार केला आहे.
सध्या याचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती उबर इट्सचा डिलिव्हरी बॉय असल्याचा दावा केला जात आहे. अपार्टमेंटमध्ये डिलिव्हरी दरम्यान तरुणाने लिफ्टमध्ये लघवी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑर्डर देणाऱ्या ग्राहकानेही डिलिव्हरी बॉयविरोधीत तक्रार केली असून त्याचा लिफ्टमधील सीसीटीव्हीत लघवी करतानाचे दृश्य कैद झाले आहे. लिप्टमध्ये प्रवेश केल्यानंततर डिलिव्हरी बॉय एका कोपऱ्यात उभा राहून लघवी करतो. तसेच लिफ्टथांबल्यानंतर तो डिलिव्हरीसाठी बाहेर पडतो. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संतापजनक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Residents of a Sydney apartment complex are demanding action from UberEats after one of its delivery riders was caught on CCTV urinating in one of its elevators. #cctv #caughtoncamera #delivery #elevator #7NEWS pic.twitter.com/Av74C0J3D1
— 7NEWS Australia (@7NewsAustralia) March 24, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @7NewsAustralia या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे की, ‘सिडनीतील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी उबरईट्सकडून कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या एका डिलिव्हरी रायडरला त्यांच्या लिफ्टमध्ये लघवी करताना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आले आहे.’ सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. एक युजरने म्हटले आहे की, अशा लोकांना बिल्डिंगच्या आत प्रवेश करुन द्यायचा नाही, तर दुसऱ्या एकाने शी त्याने त्याच हाताने डिलिव्हरी केली असे म्हटले आहे. तर अनेकांनी रागाचे इमोजी शेअर केले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.