Viral video Teacher served alcohol to students, suspended after video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होतात. स्टंट, जुगाड, डान्स, भाडंण यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकवेळा काही संतापजनक असे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. यामुळे लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
असे म्हणतात आई-वडिलांनंतर मुलांना संस्कार देण्याचे, त्यांना योग्य आणि आदर्श मार्गावर चालवण्याची शिक्षा देण्याचे एक काम शिक्षकच करतो. यातूनच मुलाचे भवितव्य सुरक्षित होते. पण अनेकवेळा काही असे शिक्षक असतात, जे मुलांना घडवण्याऐवजी. त्यांना ज्ञानाचे शिक्षण देण्याऐवजी बिघडवण्याचे काम करतात. सध्या असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका शिक्षकानेच विद्यार्थ्यांना दारु पाजली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शिक्षक विद्यार्थ्यांना दारुचा पेग कसा बनवायचा आणि दारु प्यायला शिकवत आहेत. हा व्हिडिओ मध्ये प्रदेशातील कटनी येथील आहे. लाल प्रताप सिंह असे शिक्षकाचे नाव आहे. बारवारा येथील खिरहानी गावात सरकारी शाळेत मुलांना शिकवण्याचे काम करत होता. सध्या या शिक्षकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांना निलंबित करण्यात आले आहे. व्हायरल व्हिडिओ दिसत आहे की, शिक्षक विद्यार्थ्यांना ग्लासमध्ये दारु प्यायला देत आहेय. दारु पिण्यापूर्वी त्यात पाणी मिसळण्यास सांगत आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
शिक्षा का मंदिर शर्मसार!
कटनी, मध्य प्रदेश में एक शिक्षक द्वारा मासूम बच्चों को देशी शराब पिलाने का घिनौना कृत्य सामने आया है।
यह घटना प्रदेश की शिक्षा व्यवस्था और भाजपा सरकार की लापरवाही का सीधा प्रमाण है।
भाजपा शासन में शिक्षक मर्यादा भूले बैठे हैं और सरकार आंख मूंदे बैठी है। pic.twitter.com/Zl66PF7I9x— Manjeet Ghoshi (@ghoshi_manjeet) April 18, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ghoshi_manjeet या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये विद्येच्या मंदिरात लाजिरवाणा प्रकार! मध्य प्रदेशातील कटनी येथे एका शिक्षकाने निष्पाप मुलांना देशी दारू पाजल्याचे घृणास्पद कृत्य उघडकीस आले आहे. ही घटना राज्याच्या शिक्षण व्यवस्थेच्या आणि भाजप सरकारच्या दुर्लक्षाचा थेट पुरावा आहे. भाजपच्या राजवटीत शिक्षकांना त्यांची प्रतिष्ठा विसरली आहे आणि सरकार डोळे मिटून बसले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.