Viral Video: वाघाला पाळीव समजून व्यक्तीने केली चूक, पुढे जे काही घडले; व्हिडिओ पाहून धडकी भरेल
सोशल मीडियवर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा आश्चर्यात पाडणारे व्हिडिओ व्हायरल होतात. तर कधी हसू आवरणे कठीण होईल असे मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. तसेच अनेकदा थरकाप उडवणारे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वाघाशी संबंधित आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचा देखील थरकाप उडेल.
हा एक भयानक व्हिडिओ असून व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने वाघाला पाळीव समजण्याची चूक केली आहे. त्याने वाघाला बोलवण्याचा प्रयत्न कला आहे. पण नंतर वाघाने असे काही केले आहे की, ते धडकी भरवणारे आहे. यामुळे त्या व्यक्तीचा जीव देखील धोक्यात आला होत. या घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील घाबरून जाल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी अनेक पुरूष मंडळी उभे आहेत. पाहून असे वाटत आहे की, कदाचित ते एक पर्यटन स्थळ असेल. तिथेच एक वाघ देखील दिसत आहे. त्याच्या गळ्यात लोखंडाची साखळी बांधलेली आहे. मात्र त्याला तसेच मोकळे सोडण्यात आले. इतक्यात एक व्यक्ती तिथे वाघाजवळ येतो. तो त्याला जवळ बोलवण्याचा प्रयत्न करत असतो. सुरूवातील वाघ शांत उभा असलेला दिसतो. पण काही सेंकदातच वाघ त्या व्यक्तीवर हल्ला करतो. तो व्यक्ती पळू लागतो पण अचानक खाली पडतो. त्याचवेळी तिथे जमा असलेले काही लोक त्या माणसाला वाचवायला येतात. एक व्यक्ती वाघाची साखळी ओढून त्याला थांबवतो. मात्र, हा व्हिडिओ अतिशय भितीदायक असून वन्य प्राण्यांशी छेडछाड किती धोकादायक असू शकते हे यातून कळून यते.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोसल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, पाळीव हा वाघ नसतो, तो नेहमीच वाघच असतो.’तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, वन्य प्राणी पाळीव असले तरी त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे, हे या घटनेने पुन्हा सिद्ध केले. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, सरकारने वाघाला पाळण्याची परवानगी दिली नाही पाहिजे. आणखी एका युजरने चांगलीच अद्दल घडली असेल पुन्हा असे करणार नाही तो असे म्हटले आहे, ‘ हा व्हिडिओ viral_ka_tadka या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
हे देखील वाचा- बाप रे! महिलेने सापांना कपड्यांप्रमाणे धु धु धुतले अन्; व्हिडिओ तुफान व्हायरल
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.