'हृदयी वसंत फुलताना...', मराठी गाण्यावर काका-काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, भांडण आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लग्नातील अनेक डान्सचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील अनेकदा कपल डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होत असतात.
तसेच लग्नातील नातेवाईकांचे देखील डान्स आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक कपल्सचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका रोमॅन्टीक मराठी गाण्यावर या कपलने भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. तसेच या व्हिडिओला लाखो व्हूज मिळाले आहे. तुम्ही देखील व्हिडिओ पाहिल्यावर काका-काकूंच्या प्रेमात पडाल.
हृदयी वसंत फुलताना…
व्हायरल होत असलेला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, हा व्हिडिओ लग्नातील असल्याचे लक्षात येते. याच ठिकाणी एक कपल डान्स करत आहे. पण हे कपल नवरा-नवरी नसून काका-काकू आहेत. काकांनी गुलाबी रंगाचा कुर्ता तर काकूंनी गुलाबी रंगाचा घागरा परिधान केलेला आहे. तसेच दोघेही मराठी रोमॅन्टीक गाणे हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर डान्स करत आहे. दोघांनीही एकमेकांनी गाण्यावर ताल धरत उत्तम साथ दिली आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफटर्म इन्स्टाग्रामवर @mansi.gawande.73 या अकाऊंटवर शेअरक करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हृदयी वसंत लिहिले आहे. तसेच अनेकांनी काका-काकूंच्या गाण्याचे कोतुक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, मस्तच ठुमका धराला आहे दोघांनी, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, कडक, काकांनी तर भन्नाट डान्स केला. तसेच आणखी एका युजरने म्हटले आहे की, खूप छान, गाणे देखील कूप छान निवडले आहे. सध्या या व्हिडिओला पोस्ट केल्यानंतर दोन दिवसांता लाखो व्हूड मिळाले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.