रेल्वे रुळावर तरुणांची जोरदार हाणामारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा मजेशीर तर अनेकदा चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी जुगाड, कधी स्टंट , तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. तसेच लोकांच्या भांडणांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही आत्तापर्यंत मुलींच्या आणि महिलांच्या भांडणांचे व्हिडिओ पाहिले असतील.
मुलांच्या फायटिंगचे देखील व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. कारण यामध्ये मुले रेल्वे ट्रॅकवर भांडताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. मात्र, ही मुले एकमेकांशी जोरदार भांडणे करत आहेत. जाणून घेऊयात नेमकं काय घडले ते?
नेमकं काय घडले?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेल्वे स्टेशनचा परिसर दिसत आहे. तसेच एक ट्रेन देखील थांबलेली दिसत आहे. ट्रेनच्या बाजूल आणखी एका रेल्वे रुळावर काही तरुणांची जोरदार हाणामारी सुरू आहे. कोणी काठीने तर कोणी पटरीवरील दगडाने एकमेकांना मारत आहे. दोन जण नाही चार पाचजणे मिळून एकमेकांना मारत आहेत. भांडणाचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, तरुणांमध्ये तुफान हाणामारी सुरू आहे. या दृश्याचा व्हिडिओ तेथीलच एका प्रवाशाने कॅमेरात कैद केलेला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
भले जान चल जाए लेकिन लड़ाई रुकना नहीं चाहिए
अमेठी के निहाल गढ़ रेलवे स्टेशन का बताया जा रहा वीडियो pic.twitter.com/rbMTx6wNDJ
— Priya singh (@priyarajputlive) December 8, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @priyarajputlive या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आमि लाईक केले आहे. व्हिडिओच्या कॅपश्नमध्ये लिहिले आहे की, जीव गेला तरी चालेले, पण भांडणे थांबली नाही पाहिजेत. तसेच हा व्हिडिओ उत्तरप्रदेशमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्हूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले असून मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, देवा काय हे कोणीही कुठेही भांडायला सुरूवात करत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.