फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर आपल्याला दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी डान्स, कधी भांडणांचे, लग्नासंबंधित, जुगाड, स्टंट आणि इतरही असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या लोकांना रिल बनवण्याची क्रेझ लागली आहे. जिकडे नजर जाईल तिकडे लोक रिल बनवताना दिसतात. कोणी डान्स करत असते, तर कोणी स्टंट तर कोणी आणखी काही क्रिएटीव्ह कंटेट बनवत असते.
पण अनेकदा या व्हिडिओ बनवण्यामध्ये लोकां धोकादायक अशा गोष्टी देखील करतात. कोणी रस्त्याच्या मधोमध जाउ स्टंट करत असते. तर कोणी असे स्टंट करताता की यामुळे त्यांना एकतर जीव गमवावा लागतो किंवा गंभीर दुखापत होते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा बनला असून व्हिडिओत एक आई रील बनवत असते. त्याच वेळी तिची मुलगी असे काही करते की तुमचा काळजाचा ठोका चुकले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आई रस्त्याच्या कडेला उभी राहून रिल बनवत आहे. तिच्या आसपास तिची दोन मुले खेळत आहेत. हा व्हिडिओ पाहून असे वाटते की हे कुटूंब कदाचित मनाली किंवा आणखी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेले असेल. त्याच वेळी आई रिल बनवत असताना तिचा मुलगा तिच्या आसपास खेळत असतो तो तिथे येतो. तो त्याच्या आईला त्याची बहिण रस्त्यावर पळत सुटल्याचे दाखवतो. हे पाहताच आई देखील मुलीच्या मागे फोन सोडून धावत जाते आणि मुलील सुरक्षित बाजूला घेते. सुदैवाने त्यावेळी कोणतीही गाडी तिथून जात नसते आणि आईने मुलीला लवकर बाजूला केले यामुळे कोणती दुखद घटना घडत नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
मां फोन में रील बना रही थी छोटी बच्ची बस सड़क की ओर पहुंचने वाली ही थी इतने में ही एक और बेटा आता है और इशारा करते हुए कहता है कि मां उस तरफ छोटी बहन जा रही है।
सच में बच्चे कुदरत का वह उपहार है जो घटनाओं को डालने में अहम योगदान निभाते हैं। pic.twitter.com/tQ9hzDEJ0K
— Jitu Rajoriya (@jitu_rajoriya) December 8, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @jitu_rajoriya या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. तसेच काहींनी संतापजनक प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, एवढी काय रिल बनवायची हौस की मुलांकडे दुर्लक्ष होईल, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, बारकी पोरं सुसाट धावत पळतात इकडे तिकडे अजीबात बघत नाहीत. आणखी एकाने म्हटले आहे की, बाहेर फिरायला जायचे तर मुलांना कशाला घेऊन जायचे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.