
काकांच्या प्रेमाला तोड नाही! काकूंच्या झुमक्यांसाठी स्वीकारलं अनोखं चॅलेंज, 30 पुशअप्स करत जिंकलं प्राइज; क्युट Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात जे आपल्या मनाला भिडतात. तुमच्या आवडीच्या महिलेला झुमके गिफ्ट करण्यासाठी जर तुम्हाला 30 पुश-अप्स करण्याचे चॅलेंज दिले तर ते तुम्ही स्वीकाराल का? रस्त्यावर या चॅलेंजचा बोर्ड पाहताच काकांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि काकूंना खुश करण्यासाठी त्यांनी 30 पुश-अप्स करत त्यांना बक्षिसात मिळालेले झुमके गिफ्ट केले. व्हिडिओमध्ये काही तरुण काकांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करताना दिसतात. तर व्हिडिओच्या शेवटी काकूही झुमके मिळवून फार खुश असल्याचे दिसून येते. व्हिडिओची खासियत फक्त हे झुमकेच नाही तर काकांचे काकुंवर असलेले प्रेमही व्हिडिओला आणखीन खास बनवते. विकत घेतलेली ती वस्तू आणि जिद्दीने जिंकलेली वस्तू यात बरंच साम्य असत. काकूंच्या प्रेमापोटी रस्त्यावरही काका न लाजता चॅलेंज करू लागले आणि यातच त्यांचं खरं प्रेम दिसून आलं.
दरम्यान हा व्हिडिओ @theory.thirteen नावाच्या इंस्टाग्राम एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी आशा करतो की असे प्रेम प्रत्येक मुलीला मिळूदेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याने दर्जा उंचावला नाही, तो दर्जा बनला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काका या वयात इतके फिट आहेत तर विचार करा ते तरुण वयात कसे असतील”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.