काय म्हणावं याला! भर रस्त्यात काकांना स्टंट करणं पडलं महागात; उलटे उभे राहून बाईक चालवायला गेले अन्...
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अलीकडे लोकांचे स्टंट करण्यात प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये आधी तरुण लोक धोकादायक स्टंट करत होते आता मोठ्यांचाही यामध्ये समावेश आहे. सध्या एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये एक काका उलटी बाईक चालवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेतजण आवाक् झाले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक काका स्कूटीवर उलटे उभे राहून स्कूटी चालवत आहे. विशेष म्हणजे ते रस्त्यांवर गाड्यांची रहदारी सुरू आहे. त्याच वेळी ते एका पोलिस फाटकला धडकता घडकता वाचतात. तसेच टर्न घेताना देखील त्यांच्या तोल जातो. पण तरिही ते तशीच गाडी चालवतात. या दृश्याचा व्हिडिओ तिथूनच जाणाऱ्या एका गाडीवाल्याने रेकॉर्ड केला आहे. तसेच ते त्याला प्रश्न देखील विचारत आहेत.
सध्या हा संतापजनक प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. अनेकांनी व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रीया केल्या असून अनेकांनी यामुळे समाजात चुकीचा संदेश पसरत असल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे त्या काकांचा जीव धोक्यात येऊ शकतो हे देखील त्यांच्या लक्षात येत नाही. या व्हिडिओवरुन लक्षात घेण्यासारखे आहे की असे स्टंट जीवावर बेतू शकतात. यामुळे अनर्थ घडू शकतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होतच असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @yezdaa97 या अकाऊंटर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि संतापजनक अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत. अरे दावा, काय हा प्रकार? तर आणखी एकाने म्हटले आहे की, याला पोलिसांनी चांगला बदडला पाहिजे म्हणजे अक्कल ठिकाण्यावर येईल. तर तिसऱ्या एकाने म्हटले की, नाही चांगला आदळला पाहिजे मग अक्कल येईल त्याला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.