अरे देवा! माणसाचा फनी व्हिडिओ (फोटो सौजन्य - X.com @naziya3030)
सध्या सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेशीर व्हायरल व्हिडिओ दिसून येतात. आजकाल लोक जेव्हा काही मजेदार पाहतात तेव्हा ते त्यांच्या फोनवर रेकॉर्ड करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यानंतर, या गोष्टी इंटरनेटवर व्हायरल होतात. तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यानंतर तुम्ही हसणे थांबवू शकणार नाही. असे व्हिडिओ आयुष्यात काही मजा आणतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही हसणे थांबवू शकणार नाही.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही क्षणांचा आहे, पण व्हिडिओमध्ये दिसणारा हा मजेदार क्षण तुम्ही कधीच विसरणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला रस्त्याच्या कडेला एक माणूस दिसतोय ना? त्या माणसासोबत काही केळी आहेत पण पुढे तो जे काही करतोय त्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही.
पहा व्हिडिओ
ऐसे नमूने कौन सी दुनिया से आते हैं। 🤨😂 pic.twitter.com/QfSjJ2vYn1
— Naziya Khan 💕 (@naziya3030) July 15, 2025
काय केले या माणसाने?
हा माणूस केळी घेऊन नक्की काय करत असेल? तर या माणसासह रस्त्याच्या कडेला एक माकडही दिसत आहे. तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता की, हा विचित्र माणूस रस्त्याच्या मधोमध विचित्र कृत्ये करायला सुरुवात करतो. खरं तर माकड हे खाण्याच्या शोधात आलेले दिसते. पण केळी शोधत बसलेला माकड या माणसाचे विचित्र कृत्य पाहून थक्क होतो.
मजेशीर व्हिडिओ
तुम्हाला दिसेल की त्या माणसाने केळी त्याच्या शरीराने झाकली आहेत. यामुळे केळ्यासाठी आलेले माकड केळी मात्र उचलून घेऊ जाऊ शकत नाही. त्याच वेळी, माणसाच्या विचित्र कृतींमुळे माकडदेखील घाबरतो. सहसा एखादी व्यक्ती माकडाला पाहून पळून जाते, परंतु येथे माकड त्या माणसाच्या विचित्र कृती पाहून घाबरून पळून गेलेले दिसून येत आहे. हा व्हिडिओ @naziya3030 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे पोट मात्र हसून हसून दुखेल हे नक्की.
व्हायरलसाठी काही पण
सध्या लोक इतके विचित्र वागू लागले आहेत की व्हायरल होण्यासाठी काहीही करतात. आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर फॉलोअर्स वाढावेत यासाठी वेगवेगळे व्हिडिओदेखील अपलोड केले जातात आणि इंटरनेटवर कोणताही व्हिडिओ क्षणात व्हायरल झालेला दिसून येतो. यामुळे आपला तर टाइमपास होतो मात्र काही वेळा अशा जनावरांना मात्र त्रास होतो. पण सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेला दिसून येत आहे. तुम्हीही पहा आणि द्या तुमच्या प्रतिक्रिया