viral video young girl climb on tree for making reel in saree video goes viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलकीडच्या काळात तर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणीही काहीही करायला तयार असते. कधी विचित्र, तर कधी धोकादायक असे स्टंट लोक करत असतात. अनेकदा यामुळे लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. पण तरीही लोकांना अद्याप अद्दल घडलेली नाही. यामध्ये विशेषत: तरुण मंडळींचा समावेश असतो. सध्या असाच एक स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये तरुणीने रीलसाठी हद्दच पार केली आहे. यामध्ये तरुणी उंच डोंगराळ भागात उंच झाडाच्या शेंड्यावर चढून भलताच पराक्रम करत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, डोंगराळ दरी-खोऱ्याचा परिसर दिसत आहे. या ठिकाणी एका उंच कठड्याच्या झाडावर एक तरुणी बसलेली दिसत आहे. ही तरुणी झाडावर साडी घालून बसलेली आहे. तिथेच एकजण तिचया व्हिडिओ बनवत आहे. ही तरुणी भूताची ॲक्टिंग करत आहे. तरुणी झाडावर बसून ” मी झाडांची राणी आहे, माझी गोष्ट अजून संपलेली नाही. (मैं हूं पेड़ों की रानी, खतम नहीं हुई मेरी कहानी। असे म्हणत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
युवती पेड़ की चोटी में बैठकर कह रही है, मैं हूं पेड़ों की रानी, खतम नहीं हुई मेरी कहानी।
कुछ प्राणी हैं जो जंगलों का खात्मा करवा रहे हैं?? उनकी अब खैर नहीं। वायरल रील pic.twitter.com/ZIUXKfpR1D
— Abhimanyu Singh Journalist (@Abhimanyu1305) March 6, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Abhimanyu1305 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युदरने मी, घाबरलो ना दिदी असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने एक चूक अन् खेळ खल्लास असे म्हटले आहे. आणखी एकाने दिदी अजून त्या वरच्या टोकावर जाऊन बसायचे ना असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.अलीकडे तरुणांमध्ये असे धोकादायक स्टंटचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे अनेकांनी आपला जीव गमवला आहे, मात्र तरीही लोकांना कसाचेच भान राहिलेले नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.