(फोटो सौजन्य: Instagram)
लवकरच आता उन्हाळ्याचा ऋतू सुरु होणार आहे. उन्हाळयाच्या या गरम वातावरणात आईस्क्रीम खायला कोणाला आवडत नाही, पण कधी कधी आवडत्या गोष्टींसोबत अशा घटना घडतात, ज्यामुळे आपला थरकाप उडेल. अशीच एक घटना नुकतीच थायलंडमध्ये घडली आहे. येथे एका व्यक्तीसोबत फारच विचित्र प्रकार घडला, ज्याने आता सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे. या घटनेमुळे तुमचे आईस्क्रीमप्रेम कमी होऊ शकते. व्यक्तीला थंडगार आईस्क्रीममध्ये अशी एक गोष्ट मिळाली की पाहून सर्वांनाच किंचाळी फुटली.
वास्तविक, आईस्क्रीम बार खरेदी केल्यानंतर व्यकितीने त्याची चव घेण्यासाठी पॅकेट उघडले. मात्र पुढच्याच क्षणी पॅकेटमधील दृश्य पाहून तो आश्चर्यचकित झाला. आईस्क्रीमच्या आत यावेळी एक अख्खा साप गोठून बसला होता. हे दृश्य पाहून व्यक्ती हक्काबक्का झाला आणि त्याने लगेच हे भयानक दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले. याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला जो आता व्हायरल होत आहे. लोकांना यातील दृश्य पाहून विश्वासच बसत नाहीये.
थायलंडमधील पाक थो येथील मुआंग रत्चाबुरी येथे ही घटना घडली, जिथे रेबन रेबन नकलेंगबून नावाच्या व्यक्तीने स्थानिक रस्त्यावरील विक्रेत्याकडून आईस्क्रीम खरेदी केली होती. पण जेव्हा त्याने याची चव घेण्यासाठी जेव्हा रॅपर उघडले तेव्हा त्याला आईस्क्रीमच्या आत एका काळ्या आणि पिवळ्या सापाचे डोके आईस्क्रीममध्ये गोठलेले दिसले, ज्याचे डोळे त्याच्याकडे टक लावून पाहत होते. त्याने पुढे पाहिलं तर ते फक्त डोकंच नव्हतं, तर संपूर्ण साप त्यात गोठून बसला होता.
या घटनेचा फोटो आता सर्वत्र वेगाने व्हायरल होत आहे. याची पोस्ट @trolls_official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून करण्यात आली आहे. यावर हजारो युजर्सने कमेंट्स करत या धक्कादायक घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे चीनमध्ये घडले असते तर त्यांनी एक्सट्रा टॉपिंग्स म्हणत त्याला खाल्ले असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सापाच्या फेल्व्हरची आईस्क्रीम असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मार्केटमध्ये नवीन फ्लेवर आले आहे वाटतं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.