'माझा बॉयफ्रेंड सब-इन्स्पेक्टर आहे'...; दिल्ली मेट्रोत तरुणींचा सीटवरुन राडा, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. जुगाड, स्टंट, आणि डान्स रिल्स, तसेच भांडण यासारखे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या बरेच दिवसानंतर दिल्ली मेट्रोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणींमध्ये सीटवरुन जबरदस्त राडा झाला असून एक तरुणीने दुसरीला बॉयफ्रेंडची धमकी दिली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी दुसऱ्या मुलीला धमकी देत आहे. ती म्हणते की, “माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिसात सब-इन्स्पेक्टर आहे, जर त्याला बोलावले ना तर तो सगळे समजून घेईल.” त्यावर दुसरी मुलगी उत्तर देते, “जा बोलाव तुझ्या बॉयफ्रेंडला, मला धमक्या देऊ नकोस, मी नाही घाबरत.” सीटवरुन त्यांचा जोरदार राडा सुरु आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे हे निश्चित झाले नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Kalesh b/w Two girls inside Delhi metro over Seat issues (The girl who’s standing said that “Delhi police me hai mera banda, SI hai Bulau kya?”)
https://t.co/X8fYjoxOeG— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 23, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. या घटनेवर लोकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या वादांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी अनेकांनी केली आहे.
काहींनी म्हटले आहे की, मेट्रोमध्ये दंगा करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. एका युजरने म्हटले आहे की, हे रोजचं झालंय, सगळीकडे आजकाल भांडण पाहायला मिळत आहेत. आणखी एका युजरने म्हटले आहे की, या मुलींना काही काम नसते का भांडणाशिवाय. तसेच मेट्रो प्रशासनाने अशा घटनांवर कडक उपाययोजना करण्याची गरज व्हिडिओवर व्यक्त करण्यात येत आहे. अशा व्हिडिओंना सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असून, या प्रकारांमुळे दिल्ली मेट्रोमधील शिस्तीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.