चीनमधील उंच डोंगरावरील कॉफी शॉप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर आपल्याला रोज काही ना काही वेगळं पाहायला मिळते. स्टंट, जुगाड, डान्स रिल्स असे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेट सतत व्हायरल होत असतात. खाण्या-पिण्याच्या बाबतीत देखील अनेक व्हिडिओ ब्लॉग तुम्ही पाहिले असतील. अनेक ब्लॉगर्स कोणत्या ठिकाणी काय चांगले मिळते याबाबत अने व्हिडिओ सतत पोस्ट करत असतात. सध्या हा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका उंच डोंगरावरील कॉफी शॉप असल्याचे सांगितले आहे.
अनेकांनी चहा, कॉफी पिण्यास खूप आवडते. असे लोक ते पिण्यास कुठेही जाऊ शकतात. तर काहींची यासाठी स्पेशल ठिकाणं ठरलेली असतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका डोंगरावरील कॉफी शॉप बद्दल सांगण्यात आले आहे. हे कॉफी शॉप चायना मध्ये आहे. पण मार्केटमधील साधेसुधे शॉप नाही. हा व्हिडिओ पाहिल्या वर तुमच्या लक्षात येईलच. पण हा व्हिडिओ पाहलि्यानंतर तुमचा थरकाप देखील उडेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका डोंगरावर लोकांना बसण्यासाठी काही जागा बनवण्यात आली आहे. यावर काही लोक बसलेले दिसत आहे. कॉफी पिताना जबरदस्त दृश्याचा आनंद घेण्यासाठी समोर तुमच्या एक समुद्र पाहायला मिळेल. वास्तविक हे कॉफी शॉप समुद्राच्या काठी असेलेल्या एका उभ्या डोंगरावर आहे. तसेच या ला क्लिक कॉफी असे नाव देण्यात आले आहे. व्हिडिओ बनवणारा देखील तिथे बसून कॉफीचा आनंद घेत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @chinainsider या अकाऊंट शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आवाक् झाले आहे. अनेकांनी असा अनुभव घेण्यास आवडेल असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हे अनोखे कॉफी शॉप लोकांच्या अंगावर शहारे आणणारे आहे. एका युजरने म्हटले आहे की, याचे नाव रिस्की कॉफी शॉप असयला हवे. तर आणखी एकाने म्हटले आहे की, भाऊ, काय view आहे, अप्रतिम. तिसऱ्या एकाने माझी तर बोलतीच बंद झाली असे म्हटले आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत. मग तुम्ही घ्याल का अशा ठिकाणी बसून कॉफी पिण्याचा आनंद.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.