Viral Video young girls shocking stunt on waterfall video goes viral
Viral News marathi : सोशल मीडियावर अलीकडे धोकादायक स्टंटचे प्रमाण खूप वाढले आहे. अलीकडे सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी कोणीही काहीही करायला तयार आहे. लोकांना आपल्या जीवाची देखील पर्वा नसते. तसेच या स्टंटबाजीमध्ये सर्वात जास्त व्हिडिओ बनवण्याचे प्रमाणतरुणांमध्ये वाढले आहे. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणीने धबधब्याच्या काठावर धोकादायक स्टंट केला आहे. मात्र चूकूनजरी तिचा पाय सटकाला तर जीव जाण्याची शक्यता आहे. परंतु तरीही या तरुणीच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नाही. उलट हा व्हिडिओ पाहून इतरांचा थरकाप उडाला आहे.
व्हारल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी एका मोठ्या खोल दरी असलेल्या धबधब्यावर एन्जॉय करताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणी धबधब्याच्या काठावर झोपलेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की धबधबा हजारो फूट खोल दरीत आहेत दिसायला निसर्गरम्य आणि अद्भुत सौंदर्य आहे, परंतु तितकाच घातक देखील आहे. पाण्याचा प्रवाहाचा देखील जोर जास्त आहे. अशातच चुतकूनही तरुणीचा पाय सटकला, तोल गेला तर आनंदाचे वातावरण क्षणात दु:खात बदलेल. हे सर्व दृश्य पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या दृश्याचा व्हिडिओ तरुणीसोबत असणाऱ्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
आप इसे बहादुरी कहेंगे या सबसे बड़ी बेवकूफी!
लोगों को मौत से खेलने में मजा क्यों आता है? pic.twitter.com/YAEkgO3dwg
— Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) June 25, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ @Sheetal2242 या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर तीव्र संतापजनक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने ” आता हे जग कोसळणार आहे, असे म्हटले आहे. दुसऱ्या एका युजरने कोणीतरी तिला मागून धरेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्या एकाने अशा ठिकाणी पर्यटकांसाठी कडक सुरक्षा उपाययोजना हव्यात असे म्हटले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तुम्ही याला शौर्य म्हणाल की सर्वात मोठा मुर्खपणा म्हणाल? लोकांना मृत्यूशी खेळण्यात आनंद का मिळतो? असा प्रश्न केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.