संतापजनक! वाघाला पकडले, हात्तीवर बांधले अन्...; पुढे जे झाले पाहून राग अनावर होईल, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, डान्स रिल्स, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहयला मिळतात. याशिवाय प्राण्यांशी संबंधित देकील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. कुठे प्राण्यांनी लोकांवर केलेले हल्ले तर कुठे लोकांनी प्राण्यांसोबत गैरवर्तन केलेले व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.
सध्या एक असाच व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजणांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ बिहार मधील असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये दोन माणसांनी वाघाला बांधून हत्तीवर बसवले आहे. विशेष म्हणजे, वाघाला दोराने बांधून हत्तीवर बसवले गेले आहे. हा दृश्य पाहणाऱ्यांसाठी अत्यंत आश्चर्यकारक आणि चकित करणारा आहे, कारण वाघाला जंगलातील सर्वात भयंकर प्राणी मानले जाते. व्हिडिओ बिहारमधील असल्याचे सांगितले जात असून, या दृश्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमलेली आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वाघाला दोराने घट्ट बांधून हत्तीच्या पाठीवर ठेवले गेले आहे. या परिस्थितीत वाघाला हालचाल करण्यास अजिबात संधी नाही. बांधून ठेवलेल्या वाघाला पाहून अनेक लोक चकित झाले आहेत. याशिवाय, एक व्यक्ती वाघाच्या कानाला वारंवार मरोडताना दिसत आहे. यामुळे वाघाला प्रचंड त्रास होत आहे. वाघाच्या स्वभावाच्या विरोधात जाऊन त्याच्यावर केलेला हा प्रकार प्राणी प्रेमींसाठी धक्कादायक ठरत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडिओत दिसणारे लोक फक्त याचा व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर viral_ka_tadka या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि संताप व्यक्त केला आहे. विशेष करुन प्राणी प्रेमींनी. तर काहींनी याला मनोरंजात्मक दृष्टीने पाहिले आहे. एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांवर कारवाई करण्यात यावी. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्याला एकदा सोडा मग बघा कसा फाडून खातो ते. या व्हिडिओने लोकांना प्राण्यांसोबत वागणुकीच्या विषयावर विचार करण्यास भाग पाडले आहे. मानवाने प्राण्यांसोबत नैतिक आणि संवेदनशीलतेने वागणे गरजेचे आहे. ही घटना मानवाच्या प्राण्यांच्या चुकीच्या वागणुकीबाबत प्रशन अधोरेखित करते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.