दिल्ली : देशभरामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये भाजपला 400 पार करता आलेले नसले तरी देखील एनडीए मधील घटक पक्षांच्या साथीने सरकार स्थापन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या रविवारी (दि.09) राष्ट्रपती भवन येथे शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये त्या घरातील लोक नरेंद्र मोदी यांची चक्क आरती करत आहेत.
देशभरासह जगभरातील अनेकांनी सरकार स्थापनेचा शपथविधी सोहळा घरबसल्या पाहिला. सोसल मीडियावर देखील करोडो लोकांनी हा शपथविधी सोहळा पाहिला आहे. अनेक समर्थकांनी आपला जल्लोष साजरा केला. मात्र सध्या सोशल मीडियावर एक मोदी भक्त असलेल्या कुटुंबाची व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. याचे कारण म्हणजे या कुटुंबाने चक्क नरेंद्र मोदी यांची आरती केली आहे. अनेक मोदी समर्थकांनी गुलाल उधळत आणि बॅन्डबाजासह आनंदोत्सव साजरा केला. काहींना पेढे बर्फीचे वाटप केले तर काही नाचत हा आनंद व्यक्त केला. मात्र या व्हायरल कुटुंबाची बात काहीशी निराळी आहे. त्यांनी नरेंद्र मोदी यांची टीव्हीमधून आरती ओवाळली आहे.
व्हायरल व्हिडिओ
निःशब्द, भावुक कर दिया इस वीडियो ने ? pic.twitter.com/fgfd70MYOk — Narendra Modi Fan (Modi Ka Parivar) (@narendramodi177) June 10, 2024
नरेंद्र मोदी फॅन हा ट्वीटर हॅन्डलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक कुटुंब टीव्हीसमोर थांबून आरतीचे ताट हातात घेऊन आरती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आरती करण्यात येत आहे. यामध्ये तीन जण मोदींची आरती करत आहेत. टीव्हीमध्ये शपथग्रहण सोहळा सुरु आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत.






