ग्वालियरमध्ये सुनेचा कहर! भावाला बोलवून सासूला मारलं तर नवऱ्याला ओढत... दृश्य पाहून तुम्हीही हादराल; Video Viral
ग्वालियरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने सर्वत्र खळबळ उडवली आहे. व्हिडिओमध्ये, एक महिला आपल्या सासूचा छळ करताना दिसून आली. महिलेने अक्षरशः आपल्या सासूचे केस धरून तिला मारहाण केली, तर तिचा नवरा त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. एका लहान कौटुंबिक वादातून सुरु झालेला हा राडा पुढे इतका वाढला की हे प्रकरण पोलिस स्टेशन आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयांपर्यंत पोहोचले. घटनेत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण ग्वालियरच्या आदर्श कॉलनीचे आहे. येथील रहिवासी विशाल बत्रा हे कारच्या सुटे भागांचे दुकान चालवतात. तो त्याच्या ७० वर्षांच्या आई सरला बत्रासोबत राहतो. विशालची पत्नी नीलिका बऱ्याच काळापासून तिच्या सासूला वृद्धाश्रमात पाठवण्यासाठी त्याच्यावर दबाव आणत होती, पण विशाल त्यासाठी तयार नव्हता. या प्रकरणावरून त्यांच्या घरात वाद सुरू होता, ज्याने 1 एप्रिल रोजी अचानक हिंसक रूप धारण केले. दुपारी त्याची पत्नी नीलिकाने तिचे वडील आणि भावाला घरी बोलावले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होते की महिलेचे वडील कोणतेही संभाषण न करता थेट विशालला थप्पड मारतो. विशालने याचा निषेध केला तेव्हा त्याच्यासोबत आलेले काही लोकही घरात घुसतात आणि त्याला बेदम मारहाण करू लागतात.
दरम्यान, नीलिका पहिल्या मजल्यावरून खाली येते आणि तिच्या सासूचे केस धरून त्यांना ओढत आणते. व्हिडिओमध्ये ती तिच्या सासूच्या अंगावर मुक्का मारतानाही दिसत आहे. यावेळी त्यांचा अल्पवयीन मुलगा भीतीने हे सर्व पाहत असतो. आता माहितीनुसार, सून आपल्या सासूला घराबाहेर काढण्याचा विचारात होती पण सासू आणि नवरा काही यासाठी तयार नव्हते, ज्यांनंतर सुनेने आपल्या वडिलांना आणि भावाला बोलावून त्यांना मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचा फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
MP: In Gwalior, daughter-in-law, angry at not sending her mother-in-law to an old age home, beat her up. She called people from her parents’ house and got her husband beaten up as well#MadhyaPradesh #Gwalior #Crime pic.twitter.com/sUBrPWJv0T
— Indian Observer (@ag_Journalist) April 5, 2025
दरम्यान नवरा विशालने या प्रकरणांनंतर पोलीस ठाण्यात आपल्या बायकोविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये त्याने बायको जीवे मारहाणीची धमकी देत असल्याचे आरोप केले आहेत. सध्या बायकोनं घरावर पूर्णपणे कब्जा मिळवला असून तिचे नातेवाईक घरात शिरू देत नसल्याचे गंभीर आरोप विशालने केले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून गुन्हेगारांना कठोर शासन केले जाईल असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.