(फोटो सौजन्य – X)
पाकिस्तानची अवस्था अशी झाली आहे की मागेच इथल्या लोकांनी नाव कोर दुकानं लुटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातच आता असाच एक व्हिडिओ बांगलादेशमधून समोर आला आहे ज्याने सर्वत्र खळबळ उडवली आहे. आता बांगलादेशच्या लोकांनीही दुकान लुटल्याची माहिती समोर आली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. लोक अक्षरशः दुकानात घुसून सामान लुटताना आणि दुकानाबाहेर फेकताना दिसून आली. एवढंच काय तर KFC नावामधील LED लाईट्ससुद्धा काढून नेण्यात आल्या. हा सर्वच प्रकार फार धक्कादायक असून सोशल मीडियावर आता याची चांगलीच चर्चा रंगत आहे. घटनेत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये गाझा पट्टीवरून वाद सुरू आहेत, यात बांगलादेशी लोक पॅलेस्टाईनच्या बाजूने असल्याचे म्हटले जात आहे. बांगलादेशमध्ये सोमवारी देशभरात इस्रायलविरोधी निदर्शने झाली. हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि गाझामधील इस्रायली हल्ल्यांचा निषेध करत घोषणाबाजी केली. यावेळी, जमावाने इस्रायल, अमेरिका आणि त्यांच्या सहयोगी देशांशी संबंधित व्यवसायांना लक्ष्य केले आणि तोडफोड केली.
बोगरा, सिल्हेट आणि कॉक्स बाजारसह अनेक जिल्ह्यांमध्ये बाटा, केएफसी आणि पिझ्झा हट सारख्या प्रतिष्ठित दुकानांवर हल्ले झाले. निदर्शक हिंसाचाराचा अवलंब करत होते आणि बांगलादेशात इस्रायली उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी करत होते. व्हायरल व्हिडिओमध्ये भलामोठा लोकांचा जमाव बाटा आणि केएफसीची दुकानं लुटताना आणि त्यांची तोडफोड करताना पाहू शकता. भारतातच काय संपूर्ण देशभरात आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Bangladeshi Islamists are looting every international company.
Yesterday they looted KFC and Bata, calling them Israeli owned, while they are American and Czech owned.
Foreign companies need to exit Bangladesh before they lose it all. pic.twitter.com/t7l0c9W6dN
— Arun Pudur (@arunpudur) April 8, 2025
लुटमारीचा हा व्हिडिओ @arunpudur नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘बांगलादेशी इस्लामवादी प्रत्येक आंतरराष्ट्रीय कंपनीला लुटत आहेत. काल त्यांनी केएफसी आणि बाटा यांना इस्रायलच्या मालकीचे म्हटले आणि लुटले, तर त्या अमेरिकन आणि चेक गणराज्याच्या मालकीच्या आहेत. परदेशी कंपन्यांना सर्वकाही गमावण्यापूर्वी बांगलादेशातून बाहेर पडावे लागेल’ असे लिहिले आहे. व्हिडिओला चांगलंच व्युज मिळाले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या लुटमारीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “परदेशी गुंतवणूकदारांनी युनुस आणि त्याच्या बांगलादेशी रानटी लोकांना धडा शिकवला पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जसे कराल तसे भराल”.