बाईईईईई काय प्रकार! फोनवर बोलण्याच्या नादात आपल्याच बाळाला विसरली आई; धक्कादायक Viral Video
सोशल मीडियावर नेहमीच अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ इतके मजेदार असतात की त्यांना पाहूनच आपल्याला चेहऱ्यावर हसू येते तर काही व्हिडिओ असे असतात ज्यांना पाहताच आपण थक्क होतो. आता मात्र इथे एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो अनेकांना आश्चर्याचा धक्का देत आहे. सध्या स्मार्टफोनचे प्रमाण फार वाढले आहे, लोक आपल्या प्रत्येक कामासाठी याचा वापर करताना दिसतात. परंतु आता तर इथे एक आई या स्मार्टफोनच्या नादात आपल्याच मुलाला विसरल्याने प्रकरण समोर आले आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
फोनचा वापर हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला असला तरी याचा अतिवापर आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात तुम्हाला दिसेल की, एक आई रस्त्याने फोनवर बोलत चालत आहे. मात्र यावेळी ती फोनवर बोलण्यात इतकी मग्न होते की ती बोलत बोलत पुढे जाते आणि आपले बाळ मागेच विसरते. ही घटना अनेकांसाठी फार धक्कादायक आहे.
पुढे आपण पाहू शकता की, एक व्यक्ती महिलेच्या मागून पळत पळत येतो. यावेळी तिच्या हातात एका बाळ असते. व्यक्ती हातात बाळ घेत महिलेला आवाज देण्याचा प्रयत्न करतो मात्र महिलेला त्याची हाक ऐकू येत नाही आणि ती फोनवर बोलत बोलत पुढे चालत जाते. त्यानंतर रस्त्यावरील इतर लोकही महिलेला हाका मारतात ज्यांनंतर तिचे लक्ष जाते आणि मग ती धावत व्यक्तीकडे जाऊन आपले बाळ कडेवर घेते. आधुनिक काळातील या आईचा हा पराक्रम आता सर्वत्र वेगाने व्हायरल होत आहे. युजर्स यावर आपल्या संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.
घोर कलयुग 😂😂 pic.twitter.com/KoFP7PIZuL
— Kattappa (@kattappa_12) March 4, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @kattappa_12 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘घोर कलयुग’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे सर्व काय पाहावं लागत आहे, बरं झालं मी लग्न नाही केलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हद्दच झाली फोन इतका महत्त्वाचा नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.