(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. यातील दृश्ये बऱ्याचदा लोकांना थक्क करून जातात. इथे असे अनेक प्रकार व्हायरल होतात ज्यांना आपण याआधी कधीही पाहिले नसावे. आताही इथे असाच इथे व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात जंगलाच्या राजांची एक अनोखी मैत्री दिसून आले. वास्तविक जंगलात सिंहाचे राज्य चालते असे म्हटले जाते. आपल्या बलाढ्य शक्तीने तो भल्यामोठ्या प्राण्यांचा आपली शिकार बनवतो. आजवर सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत मात्र आताच त्याच्या मैत्रीचा हा व्हिडिओ सर्वांनाच थक्क करत आहे. सिंहाचे हे रूप आजवर कोणीही कधीही न पाहिल्याने हा व्हिडियो आता वेगाने शेअर केला जात आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडीओमध्ये दोन सिंह गीरच्या जंगलात झाडावर विसावलेले दिसून येत आहेत, जणू काही ते एकमेकांशी संवाद साधत आहेत. असे दृश्य क्वचितच कोणी पाहिले असेल. दोन्ही सिंह पूर्णपणे रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत आणि समोरील दृश्याचा आणि वातावरणाचा मुक्त आनंद लुटत आहे. जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यूजर्स तो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. हे पाहून काही लोक गंमतीने म्हणत आहेत की, “जय-वीरू जोडीही त्यांच्या अनोख्या मैत्रीसमोर अपयशी ठरली आहे!”
ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे।
धूप में ऊपरी मंजिल पर ठंडी छांव में बाते करते दो दोस्त।#સિંહ #સાવજ #Lion #ગીર #ગાંડીગીર #Girforest #nature pic.twitter.com/kgOymFLsGi — ગીર નો સાવજ (@MukeshRvala12) March 1, 2025
अरे बापरे! इथे केली जाते पालींची शेती, पण कशी? भयानक दृश्ये पाहून तुम्हालाही येईल किळस; Video Viral
सिंहाच्या मैत्रीचा हा अनोखा व्हिडिओ @MukeshRvala12 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ही मैत्री कधीही तुटणार नाही, उन्हात वरच्या मजल्यावर थंड सावलीत दोन मित्र संवाद साधत आहेत’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून आता अनेकांनी कमेंट्स करत सिंहाच्या मैत्रीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “माणसाच्या मैत्रीत कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो, पण प्राण्यांची मैत्री निस्वार्थी असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निस्वार्थ मैत्री, खूप सुंदर” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जय आणि वीरूची मैत्री आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






