किंग कोब्रासोबत रोमांस करू लागली महिला, जीभ बाहेर काढत घेतली किस, मग कोब्राने जे केलं... धक्कादायक Video Viral
सापांच्या जगात किंग कोब्रा हा सर्वात विषारी प्राणी मानला जातो. त्याच्या विषाचा एक थेंबही माणसांना मारण्यासाठी पुरेसा आहे. यामुळेच किंग कोब्रापासून माणसेच नाही तर प्राणीही दूर राहतात. त्याला पाहताच लोक आपली वाट बदलतात आणि दुसऱ्या दिशेने जाऊ लागतात. त्याच्या एक दंश मोठमोठ्या प्राण्यालाही मृत्यूच्या दारी पोहचवू शकते. अलीकडेच सोशल मीडियावर किंग कोब्राचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता तुम्हाला वाटतं असेल की यात कोब्रा कुणालाही तरी दंश करत असेल पण असे नाही यात जे घडताना दिसत आहे, ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन हादरून जाईल.
काय आहे व्हिडिओत?
नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जे दिसले ते पाहून लोक आवाक् झाले. व्हिडिओमध्ये एक महिला किंग कोब्रासमोर नाचताना दिसत होती. एवढेच काय तर यावेळी ती सापाला किस देखील करत होती. व्हिडिओमध्ये एक महिला कोणतीही भीती न बाळगता किंग कोब्राच्या समोर नाचताना दिसत आहे. असे करत असताना किंग कोब्रा तिच्याकडे एकटक बघत असतो यांनतर ती कोब्राचे लक्ष दुसरीकडे असताना अचानक आपली जीभ बाहेर काढते आणि कोब्राला चाटते. व्हिडिओतील हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हेदेखील वाचा – आईची चूक बेतली मुलाच्या जीवावर! भररस्त्यात स्कुटरवरून खाली पडला चिमुकला, संतापजनक Video Viral
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टेजवर एक महिला सापासमोर पडून नाचत आहे. साप फणा पसरून बसला आहे. महिला प्रथम कोब्राला तिच्या जिभेने चाटते आणि नंतर त्याचे चुंबन करते. पुढच्याच क्षणी कोब्रा वळतो आणि महिलेवर हल्ला करतो पण ती महिला वाचते. महिलेला बहुतांश कोब्राला हाताळण्याचा अनुभव असावा, ज्यामुळे कोब्राला अजिबात न घाबरता ती त्याच्यासमोर नाचत असते. व्हिडिओमध्ये ती महिला आपल्या जिभेने विषारी सापाला वारंवार चाटताना दिसत आहे. हे सर्व दृश्य आजुबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेरात कैद केले आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जो सध्या व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – आईच काळीज इतक धाडस करू शकत! मृत्यूच्या विळख्यात अडकलेल्या मुलीचे आईने वाचवले प्राण, थरारक Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @lucky_udaan4090 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘गजब भावा’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर एक लाखाहून अधिक लोकांनी लाइक्स देऊन यावर आपली पसंती दर्शवली आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुम्ही वन्य प्राण्याला का त्रास देत आहात?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लाज वाटावी, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असावी, तुम्ही कोणत्याही जीवाला का त्रास देत आहात, तुम्हाला असा त्रास झाला तर तुम्हाला कसे वाटेल?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.