अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण फार वाढले आहे. गाडी चालवत असताना आपली आणि इतरांची काळजी घेणे फार महत्त्वाचे ठरते अन्यथा जीव धोक्यात जाण्याची शक्यता असते. आपली एक चूक कुणाच्याही जीवावर बेतू शकते, ज्यामुळे वारंवार गाडी चालवताना रस्ते नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि परिणामी गंभीर अपघातांना बळी पडतात. बऱ्याचदा अशा काही अपघातांचे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करण्यात येतात. हे व्हिडिओ अनेकदा अंगावर काटा आणतात.
सध्या अशाच प्रकारच्या एका अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात आपल्याच आईची चूक एका चिमुकल्याचा जीववर बेतल्याचे दिसून येत आहे. नक्की काय घडते याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – आईच काळीज इतक धाडस करू शकत! मृत्यूच्या विळख्यात अडकलेल्या मुलीचे आईने वाचवले प्राण, थरारक Video Viral
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला आश्चर्यचकित करतील. व्हिडिओमध्ये आपल्याला एक महिला स्कुटरवर आपल्या लहान मुलाला पुढे उभे करून गाडी चालवताना दिसून येत आहे. ही स्कुटर चालवताना अचानक समोरील गाड्या थांबतात ज्यामुळे महिलेला आपली गाडी अचानक थांबवावी लागते आणि या नादात ती जोरात ब्रेक मारते. गाडीला ब्रेक मारताच पुढे उभा असलेल्या चिमुकल्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो.
मूल खाली पडताच महिला त्याला उचलायचा प्रयत्न करते; पण स्कूटरवर बसून आणि तोल सांभाळून तिला तिच्या मुलाला उचलणं शक्य होत नाही. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे येतो आणि रस्त्यावर पडलेल्या या मुलाला उचलतो आणि त्याच्या आईच्या स्वाधीन करतो. आता या सर्व घटनेवेळी महिलेच्या तोंडात सिगारेट असते म्हणजेच ती धूम्रपान करत असते जे पाहून लोक चिमुकल्यासाठी हळहळ आणि महिलेवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
हेदेखील वाचा – … म्हणूनच ती गौमाता! जखमी बिबट्याला गायीने केली मदत, कधीही न पाहिलेले दृश्य, Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @taiwan_memes66 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओला ‘आई इतकी घाबरली होती की, ती गाडी कशी उभी करायची हेच विसरली’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 19 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बिचारा मुलगा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिला तिच्या मुलीपेक्षा तिच्या मोटारसायकलची जास्त काळजी आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.