Woman plays DJ while paragliding at a height of 10 thousand feet video viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र, तर कधी भयावह व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून हूसन पोट दुकून येते, तर काही व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिलेने पॅराग्लायडिंग करताना असे काही धाडस केले आहे की यामुळे तिची सर्वत्र वाह वा होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही भारतीय महिला आहे. या महिलेने १० हजार फूट उंचीवर डीजे वाजवला आहे. पॅराग्लायडिंग करताना तिने हे साहस केले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला पॅराग्लायडिंग करातान दिसत आहे. तिच्या हातात डीजेचा एक मोठा पॅनल आहे. पॅराग्लायडिंग करातान ती डीजे वाजवत आहे. डीजे ट्रिप्स असे तिचे नाव आहे. पॅराग्लाइडिंग करताना इनस्टाग्रामवरही लाइव तिने केले होते. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. परंतु याचे लोकेशन कुठले आहे याची माहिती मिळाली नाही. नेमकं कुठे पॅराग्लायडिंग करण्यात आले हे कळू शकलेले नाही. अनेकांनी याला ऐतिहासिक क्षण म्हटले आहे.
डॉगेश भाईचा जंगलात दरारा! कुत्र्याने भूकंताच सिंहीणीने ठोकली धूम, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ DJ TYPS ने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्राम अकाउंटवर @tryps.music हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. एका युजरने खूप धाडसाचे काम केलं असे म्हटले आहे, तर एका टीका करत याचा काय फायदा तिथे प्रेक्षक थोडी आहेत असे म्हटले आहे. तर एका युजरने एवढ्या उंचावर हवेत गाण्याचा आवाज ऐकू आला? असा प्रश्न केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
धक्कादायक! मुलांच्या हातात बाईकची चावी देणं पडलं महागात; घडला भयंकर अपघात, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.