Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्रात तरंगताना दिसले iPhone 18 आणि महागडे परफ्यूम! लूटण्यासाठी मच्छिमारांनी मारल्या पाण्यात उड्या; Video Viral

समुद्रात मासे नव्हे, तर आयफोन, महागडे परफ्यूम आणि मौल्यवान वस्तू तरंगताना दिसल्या तर? होर्मुझच्या सामुद्रधुनीतील मालवाहू जहाजाशी संबंधित असल्याचा दावा केला जाणारा एक व्हिडिओ सोशल मीडिया

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2026 | 02:30 PM
समुद्रात तरंगताना दिसले iPhone 18 आणि महागडे परफ्यूम! लूटण्यासाठी मच्छिमारांनी मारल्या पाण्यात उड्या; Video Viral

समुद्रात तरंगताना दिसले iPhone 18 आणि महागडे परफ्यूम! लूटण्यासाठी मच्छिमारांनी मारल्या पाण्यात उड्या; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझच्या सामुद्रधुनीत मालवाहू जहाजाला आग लागून ते बुडाल्याचा दावा केला जात आहे.
  • जहाजातून आयफोन, परफ्यूम आणि इतर मौल्यवान वस्तू समुद्रात वाहून गेल्याचे व्हिडिओत सांगितले जात आहे.
  • जहाजावर हल्ला झाला की ते सागरी सुरुंगावर आदळले, याबाबत वेगवेगळे दावे समोर आले आहेत.
समुद्रात मासे तर आपण सर्वांनी पाहिले असतील पण समद्राच्या पाण्यात आयफोन, महागडे परफ्यूम्स आणि इतर माैल्यवान वस्तू तरंगताना तुम्ही कधी पाहिलंय का? सोशल मिडियावर अशीच एक घटना व्हायरल झाली आहे. व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये बुडालेल्या एका मालवाहू जहाजातून हा माल समुद्रात पडल्याचे सांगण्यात येत आहे. या दाव्याविषयी अधिकृत पुष्टी अद्याप झाली नसून घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काय आहे प्रकरण ते चला सविस्तर जाणून घेऊया.

Video Viral : कोटाच्या ALLEN कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा! बॅगेतून काढली ‘पिस्तुल’; विद्यार्थिनीवरून पेटला होता वाद

जहाज पाण्यात कसे बुडाले?

‘द टेलीग्राफ’ रिपोर्टनुसार, सिंगापूरचे ध्वज असलेले ‘जीएफएस प्राईड’ नावाचे मालवाहू जहाज १३ ऑक्टोबर २०२६ रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत होते. यावेळीच जहाजावर एका अज्ञात वस्तूने हल्ला करण्यात आला. यानंतर जहाजाला आग लागली आणि तो समुद्रात बुडाला. सिंगापूरच्या सागरी प्रशासनानुसार, जहाजावर उपस्थित सर्व २१ क्रू मेंबर्स सुरक्षित यातून बाहेर पडले आहेत. या घटनेत कुणीही जखमी झाल्याची बातमी समोर आलेली नाही. तथापि, जहाजाचे यात किती नुकसान झाले आणि या घटनेमुळे जहाजातील किती सामान समुद्रात वाहून गेले याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

🇮🇷 The Strait of HORMUZ has become the world’s most dangerous APPLE STORE After the container ship GFS Pride sank with more than 2,500 containers aboard, Iranian fishermen have been heading out to sea to collect floating iPhones, French perfumes and whatever else the Gulf has… — Mario Nawfal (@MarioNawfal) October 16, 2026

पेट्रोलचे वाढते भाव आणि ट्रॅफिकला कंटाळून व्यक्तीने थेट आकाशालाच बनवला ऑफिसचे रस्ता; भन्नाट जुगाड पाहून डोळे विस्फारतील!

जहाज बुडाल्यानंतर समुद्राच्या पाण्यात तरंगणाऱ्या लग्झरी वस्तूंचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार, काही इराणी मच्छिमार आणि बोट चालवणारे जहाजाच्या जवळपास होते. सांगितले जात आहे की, त्यांनी पाण्यात उडी मारुन पाण्यातून आयफोन, परफ्यूम आणि इतर वस्तू उचलल्या. व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक समुद्राच्या पाण्यात उतरुन सामान गोळा करताना दिसले. या घटनेबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जात आहेत. सिंगापूर प्रशासनाने सांगितले आहे की, जहाजाला क्षेपणास्त्राचा फटका बसला होता. तर दुसरीकडे, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने दावा केला आहे की, जहाज एका सागरी सुरुंगावर आदळले होते.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Hormuz strait cargo ship sinks viral video iphone perfume floating sea luxury items nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • hormuz
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Video Viral : कोटाच्या ALLEN कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा! बॅगेतून काढली ‘पिस्तुल’; विद्यार्थिनीवरून पेटला होता वाद
1

Video Viral : कोटाच्या ALLEN कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा! बॅगेतून काढली ‘पिस्तुल’; विद्यार्थिनीवरून पेटला होता वाद

पेट्रोलचे वाढते भाव आणि ट्रॅफिकला कंटाळून व्यक्तीने थेट आकाशालाच बनवला ऑफिसचे रस्ता; भन्नाट जुगाड पाहून डोळे विस्फारतील!
2

पेट्रोलचे वाढते भाव आणि ट्रॅफिकला कंटाळून व्यक्तीने थेट आकाशालाच बनवला ऑफिसचे रस्ता; भन्नाट जुगाड पाहून डोळे विस्फारतील!

रुग्णालय की मद्यालय? वायसीएमच्या शवविच्छेदन कक्षात मद्याच्या बाटल्या अन्…; व्हिडीओच्या दाव्याने खळबळ
3

रुग्णालय की मद्यालय? वायसीएमच्या शवविच्छेदन कक्षात मद्याच्या बाटल्या अन्…; व्हिडीओच्या दाव्याने खळबळ

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral
4

टोल कर्मचाऱ्याने कापू पाहिलं खोटं चलन, चालकाने धरला हात अन् चालू गाडीतच सपासप हाणलं कानशिलात; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.